 
						Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनी शेअर पुन्हा फोकसमध्ये येण्याचे (NSE: TATATECH) संकेत आहेत. टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीने त्रिपुरा सरकारसोबत महत्वाचा करार केला आहे. या करारानुसार टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीला त्रिपुरा राज्यातील आयटीआय अपग्रेड करायचा आहे. अपग्रेडेशननंतर या आयटीआयमध्ये नवे शॉर्ट टर्म कोर्स देखील सुरू केले जाणार आहेत. (टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनी अंश)
टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या कॉन्ट्रॅक्टची एकूण किंमत 95 कोटी रुपये आहे. या कॉन्ट्रॅक्टमध्ये अपग्रेड, देखभाल, प्रशिक्षण आणि संबंधित सेवांचा समावेश आहे. गुरुवार 21 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.60 टक्के घसरून 942.90 रुपयांवर पोहोचला होता.
टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीने दिली माहिती
आयटीआय अपग्रेड प्रकल्पासाठी त्रिपुरा सरकारच्या उद्योग आणि वाणिज्य विभागाने टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीसोबत करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. या ककॉन्ट्रॅक्टनुसार टाटा टेक्नॉलॉजीज कंपनी दोन टप्प्यात त्रिपुरा राज्यातील एकूण १९ आयटीआय अपग्रेड करणार आहे. या एकूण १९ आयटीआय अद्ययावत झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने नवीन अभ्यासक्रम सुद्धा सुरू केले जातील. टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीला हा कॉन्ट्रॅक्ट ५ वर्षे ९ महिन्यात पूर्ण करावा लागणार आहे. तसेच या प्रोजेक्टचा विस्तार करण्याची शक्यताही करारात नमूद करण्यात आल्याची माहिती कंपनीने दिली आहे. या कॉन्ट्रॅक्टची एकूण किंमत ९५ कोटी ६५ लाख रुपये आहे.
डेली चार्टवर टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड
सेबीचे नोंदणीकृत शेअर बाजार तज्ज्ञ ए. आर. रामचंद्रन यांनी म्हटले की, ‘टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनी शेअर मागील काही दिवस सातत्याने घसरतो आहे, मात्र डेली चार्टवर शेअर ओव्हरसोल्ड असल्याचे दिसते आहे. पुढे हा शेअर ११२० रुपये टार्गेट प्राईसपर्यंत पोहोचू शकतो. पण टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ९९७ रुपयांच्या वर जात असेल तरच गुंतवणूकदारांनी शेअर खरेदी करण्याचा निर्णय घ्यावा असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. तज्ज्ञांच्या मते, टाटा टेक्नॉलॉजीज शेअरला 881 ते 800 रुपयांच्या आसपास मजबूत सपोर्ट आहे. तसेच १०४० रुपयांच्या लेव्हलवर रेझिस्टन्स आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		