
Tata Technologies Share Price | गुरुवार, 23 जानेवारी 2025 रोजी टाटा टेक्नॉलॉजीज शेअर 1.43 टक्क्यांनी वाढून 810.35 रुपयांवर पोहोचला होता. विशेष म्हणजे टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीचा शेअर बुधवारी तीन टक्क्यांनी घसरून 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला होता.टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 32,892 कोटी रुपयांवर आला आहे. आता जेएम फायनान्शिअल ब्रोकरेज फर्मने टाटा टेक्नॉलॉजीज कंपनी शेअरसाठी तेजीचे संकेत दिले आहेत.
टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये
टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीच्या शेअरमध्ये ०.७ चा बीटा आहे, जो वर्षभरातील अत्यंत कमी अस्थिरता दर्शवितो. टेक्निकल चार्टनुसार टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीचा रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स म्हणजे आरएसआय २९.७ इतका आहे, ज्यामुळे स्टॉक ओव्हरसोल्ड झोनमध्ये ट्रेड करत असल्याचे संकेत मिळत आहेत.
टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल
तिसऱ्या तिमाहीत टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीच्या एकत्रित निव्वळ नफ्यात १ टक्क्यांची घसरण झाली आहे. गेल्या तिमाहीच्या तुलनेत टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीचा नफा घटून १६९ कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जो मागील वर्षी याच तिमाहीत १७० कोटी रुपये होता.
तिसऱ्या तिमाहीत टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीचा महसूल २ टक्क्यांनी वाढून १,३१७ कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जो गेल्या वर्षाच्या याच तिमाहीत १२८९ कोटी रुपये होता. दुसऱ्या तिमाहीच्या १,२९६ कोटी रुपयांच्या तुलनेत महसुलात १.६ टक्क्यांची वाढ झाली आहे. दुसरीकडे, ऑपरेटिंग रेव्हेन्यू 2.2 टक्क्यांनी वाढून 1,317.4 कोटी रुपये आणि क्यूओक्यू 1.6 टक्क्यांवर पोहोचला आहे.
जेएम फायनान्शिअल ब्रोकरेज फर्म – शेअर टार्गेट प्राईस
जेएम फायनान्शिअल ब्रोकरेज फर्मने टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. जेएम फायनान्शिअल ब्रोकरेज फर्मने टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग सह ११५० रुपये टार्गेट प्राईस निश्चित केली आहे. यापूर्वी ब्रोकरेजने ११२० रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली होती. ही टार्गेट प्राईस सध्याच्या किंमतीपेक्षा ४० टक्क्यांनी अधिक आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.