
Tatkal E-Tickets Rules | तात्काळहून कन्फर्म ई-तिकीट बुक करणे एखाद्या मिशनपेक्षा कमी नाही. विशेषत: बिहार, यूपी आणि महाराष्ट्राच्या गाड्यांमध्ये तात्काळ ई-तिकीट मिळणं खूप कठीण असतं. तात्काळ ई-तिकीट बुकिंगसाठी काही नियम आहेत, ज्याबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. असाच एक नियम पीएनआरशी संबंधित आहे. पीएनआरवर किती तिकीट बुकिंग शक्य आहे हे तुम्हाला माहिती आहे का? चला तर आपण जाणून घेऊया.
काय आहे नियम :
नियमानुसार तात्काळ ई-तिकिटावर प्रत्येक पीएनआरमागे जास्तीत जास्त चार प्रवासी आरक्षित करता येतात. म्हणजेच एका पीएनआरवर चार जणांपर्यंतची तिकीटं मिळू शकतात. मात्र, चारही तिकिटांचे शुल्क तुम्हाला द्यावे लागणार आहे.
शुल्क सामान्य तिकिटापेक्षा जास्त :
प्रत्येक प्रवाशाला तात्काळ तिकीट शुल्क सामान्य तिकिटापेक्षा जास्त आहे. कन्फर्म तत्काल तिकिटे रद्द केल्यास परतावा मिळत नाही. त्याचबरोबर वेटिंग लिस्टचे तिकीट रद्द झाल्यास सध्याच्या रेल्वेच्या नियमानुसार शुल्क वजा करण्यात येणार आहे.
प्रवाशांच्या सोयीसाठी तिकीट बुकिंग :
अलिकडेच भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी तिकीट बुकिंगसंदर्भात काही बदल केले आहेत. आधारशी लिंक नसलेल्या ‘आयआरसीटीसी’च्या युजर आयडीमुळे आता 6 ऐवजी एका महिन्यात 12 तिकीट बुक करता येणार आहेत. त्याचबरोबर आधारशी लिंक केलेल्या युजर आयडीने एका महिन्यात 12 तिकिटांची कमाल मर्यादा 24 तिकिटांपर्यंत वाढवण्यात आली आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.