 
						TCS Share Price | या आठवड्यात शेअर बाजारातील सर्व तज्ञ आणि शेअर धारकांचे लक्ष आयटी कंपन्यांवर असेल. याचे मुख्य कारण म्हणजे या आठवड्यात आयटी कंपन्या आपले चौथ्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर करणार आहेत. यापैकी ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’ देखील आपले तिमाही निकाल जाहीर करणार आहे. TCS कंपनीच्या शेअरवर लक्ष ठेवणाऱ्या तज्ज्ञांचे मत आहे की, या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 3615 रुपये किंमत पातळी स्पर्श करू शकतात. (Tata Consultancy Services Ltd)
टीसीएस शेअर टार्गेट प्राईस :
आयटी क्षेत्रातील कंपन्यासाठी आर्थिक वर्ष 2022-23 मधील शेवटच्या चौथ्या तिमाहीचे निकाल फारसे अनुकूल ठरतील असे वाटत नाही. अमेरिकन बँकिंग क्राईसेस आणि आर्थिक मंदीचे संकेत आणि शेअर बाजारातील अस्थिरतेसोबतच युरोपीय देशांमधील महागाईचा वाईट परिणाम टीसीएस सारख्या दिग्गज भारतीय आयटी कंपनीच्या तिमाही निकालांवर स्पष्टपणे दिसून येऊ शकतो. संभाव्य मंदीच्या भीतीने आयटी क्षेत्र पूर्णपणे हादरले आहे. अनेक नकारात्मक कारणामुळे आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये मंदी पाहायला मिळत आहे.
‘IDBI कॅपिटल मार्केट्स’ फर्मने ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’ कंपनीचे शेअर्स होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्मला विश्वास आहे की, टीसीएस कंपनीचे शेअर्स पुढील काळात 3615 रुपये पर्यंत वाढू शकतात. मागील आठवड्यात गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’ कंपनीचे शेअर्स 0.65 टक्के घसरणीसह 3218.90 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज मंगळवार दिनांक 11 एप्रिल 2023 रोजी टीसीएस कंपनीचे शेअर्स 0.41 टक्के घसरणीसह 3,250.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
शेअर बाजारात कंपनीची स्थिती :
2023 या वर्षात टीसीएस कंपनीचे शेअर्स 1.30 टक्क्यांनी कमी झाली आहे. या कालावधीत निफ्टी निर्देशांक 4.12 टक्क्यांनी कमजोर झाला आहे. त्याच वेळी ज्या गुंतवणूकदारांनी एक वर्षापूर्वी टीसीएसचे शेअर्स खरेदी केले होते, त्यांना सध्या 12 टक्क्यांहून अधिक नुकसान सहन करावा लागत आहे. टीसीएस कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 3809.30 रुपये प्रति शेअर होती. तर शेअरची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी प्रति शेअर 2926.10 रुपये होती.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		