 
						TCS Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’ म्हणजेच TCS कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना बक्कळ कमाई करून दिली आहे. ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’ कंपनीचे शेअर्स मागील काही वर्षांत 118 रुपयांवरून वाढून 3100 रुपयांवर पोहचले आहेत. ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’ कंपनीच्या शेअर्सनी या कालावधीत आपल्या गुंतवणुकदारांना 2500 टक्के नफा कमावून दिला आहे. TCS कंपनीने या कालावधीत शेअर धारकांना दोन वेळा बोनस शेअर्स देखील वाटप केले होते. 14 वर्षांपूर्वी ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’ कंपनीच्या शेअरवर एक लाख रुपये लावणारे लोक करोडपती झाले आहेत. (Tata Consultancy Services Limited)
20 फेब्रुवारी 2009 रोजी ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’ कंपनीचे शेअर्स 118.49 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. जर तुम्ही 20 फेब्रुवारी 2009 रोजी TCS कंपनीच्या शेअर्सवर 1 लाख रुपये लावले असते तर तुम्हाला 843 शेअर्स मिळाले असते. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीने जून 2009 मध्ये लोकांना 1 : 1 आणि मे 2018 मध्ये 1 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर वाटप केले होते. बोनस शेअर्स मिळाल्यानंतर तुमच्या शेअरची एकूण संख्या 3372 झाली असती. 13 एप्रिल 2023 रोजी हा स्टॉक 3189.85 रुपये किमतीवर क्लोज झाला होता, त्यानुसार तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 1.07 कोटी रुपये झाले असते.
गुंतवणुकीवर परतावा :
मागील 10 वर्षांत TCS कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना बंपर नफा कमावून दिला आहे. 26 एप्रिल 2013 रोजी या कंपनीचे शेअर्स 684.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. जर तुम्ही 10 एप्रिल 2013 रोजी TCS शेअरवी 1 लाख रुपये लावले असते तर तुम्हाला 146 शेअर्स मिळाले असते. आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने 2013 नंतर मे 2018 मध्ये 1 : 1 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप केले होते. बोनस शेअर्स जोडल्यानंतर तुमच्या शेअरची एकूण संख्या 292 झाली असती. आणि तुमच्या गुंतवणुकीचे एकूण मूल्य 9.33 लाख रुपये झाले असते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		