27 April 2024 9:59 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

Hot Stock | मस्तच! टॉप म्युच्युअल फंड कंपनीने हा शेअर खरेदी केला, 2 दिवसात 11% परतावा, तुम्ही फायदा घेणार का?

Hot Stock

Hot Stock | जिंदाल स्टेनलेस कंपनीचे शेअर बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर इंट्रा-डे ट्रेडमध्ये 6 टक्क्यांच्या जबरदस्त वाढीसह 208.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. स्टॉक मध्ये अचानक वाढीचे कारण म्हणजे क्वांट म्युच्युअल फंडाने या कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी गुंतवणूक केली, आणि स्टॉकने उसळी घेतली. क्वांट म्युचुअल फंड फर्मने खुल्या बाजारातून जिंदाल स्टेनलेस कंपनीचे सुमारे 26 लाख शेअर्स खरेदी केले. त्यामुळे हा स्टॉक मागील दोन ट्रेडिंग सेशनमध्ये सुमारे 16 टक्क्यांनी वाढला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Jindal Stainless Share Price | Jindal Stainless Stock Price | BSE 532508 | NSE JSL)

6 डिसेंबर 2022 रोजी Quant Small Cap Mutual Fund ने NSE इंडेक्सवर जिंदाल स्टेनलेस कंपनीचे 2.63 दशलक्ष शेअर्स 182.97 रुपये प्रति शेअर या किमतीवर खरेदी केले आहेत. हे प्रमाण जिंदाल स्टेनलेस कंपनीच्या एकूण भाग भांडवलाच्या 0.52 टक्के आहे. स्टॉक विक्रेत्यांची नावे अजूनही उघड करण्यात आलेली नाहीत.

जिंदाल समूहाच्या शेअर्समध्येही वाढ :
आज स्टॉक मार्केट ट्रेडिंग सेशनमध्ये एनएसई इंडेक्सवर जिंदाल ग्रुपमधील जिंदाल स्टेनलेस-हिसार चे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 380 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील दोन दिवसांत या स्टॉकमध्ये 11 टक्क्यांची जबरदस्त वाढ पाहायला मिळाली आहे.

कंपनीची उलाढाल :
जिंदाल स्टेनलेस कंपनीची स्थापना ओ पी जिंदाल यांनी 1970 साली केली होती. या कंपनीची त्याची वार्षिक स्टील उत्पादन क्षमता 1.9 MT असून वार्षिक उलाढाल 4.20 अब्ज डॉलर्स आहे. कंपनीची वार्षिक स्टील उत्पादन क्षमता आर्थिक वर्ष 2022-23 च्या अखेरीस 2.9 दशलक्ष टनपर्यंत आली आहे. जिंदाल स्टेनलेस कंपनीचे भारतात हरियाणा राज्यात आणि ओडिशा राज्यांत स्टील उत्पादन संकुल आहेत. सोबत इंडोनेशियात देखील दोन स्टेनलेस स्टील उत्पादन संकुल आहेत . जिंदाल स्टेनलेस कंपनी भारतात एकूण 10 विक्री कार्यालयांचे राष्ट्रव्यापी नेटवर्क विस्तारलेले असून संपूर्ण जगभरात एकूण 12 जागतिक कार्यालये काम करत आहेत. जिंदाल स्टेनलेस कंपनीच्या उत्पादन श्रेणीमध्ये स्टेनलेस स्टील स्लॅब, ब्लूम्स, कॉइल , प्लेट्स, शीट्स, अचूक पट्ट्या, ब्लेड स्टील, कॉइन ब्लँक्स यांचे उत्पादन केले जाते.

महत्त्वाचा व्यापारी करार :
जिंदाल स्टेनलेस कंपनीने सोमवार दिनांक 5 डिसेंबर 2022 रोजी भारतातील सर्वात मोठ्या अक्षय ऊर्जा निर्मिती करणाऱ्या रिन्यू पॉवर या कंपनीशी व्यापारी करार केला आहे. या करारात ओडिशातील त्याच्या जाजपूर स्टील प्लांटला वीज पुरवठा करण्यासाठी युटिलिटी स्केल कॅप्टिव्ह रिन्यूएबल एनर्जी प्लांट प्रकल्प विकसित करण्याची तरतूद करण्यात आली आहे. या करारा अंतर्गत Renew Power कंपनी जिंदाल स्टेनलेस कंपनीला वार्षिक 700 दशलक्ष युनिट्सची निर्मिती करणारा ऊर्जा प्रकल्प तयार करून देईल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Hot Stock Jindal Stainless stock price zoomed after Quant Small Cap Mutual fund investment check details on 09 December 2022.

हॅशटॅग्स

#Hot Stock(315)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x