Link Pan Card with Aadhaar Card | पॅन आधारसोबत लिंक करण्याच्या मुदतीत वाढ | 31 मार्च 2022 पर्यंत वाढवली तारीख

मुंबई, १८ सप्टेंबर | केंद्र सरकारने पॅन कार्डशी आधार जोडण्याच्या तारीखेत पुन्हा एकदा वाढ केली आहे. यापूर्वी केंद्र सरकारने ही 30 सप्टेंबर 2021 ही शेवटची तारीख दिली होती. परंतु, यामध्ये वाढ करत 31 मार्च 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे अशी माहिती अर्थ मंत्रालयाने दिली आहे. जर तुम्ही याकडे दुर्लक्ष करत पॅन आधारसोबत जोडणी केली नाही तर मोठे नुकसान होऊ शकते. यामाध्यमातून तुमचे पॅन निष्क्रिय घोषित केले जाईल. निष्क्रिय पॅन वापरल्यास तुम्हाला 10,000 रुपये दंड होऊ शकतो. त्यामुळे ही समस्या टाळण्यासाठी तुम्हाला 31 मार्च 2022 पर्यंत आधार-पॅन लिंक करणे गरजेचे आहे.
Link Pan Card with Aadhaar Card, पॅन आधारसोबत लिंक करण्याच्या मुदतीत वाढ, 31 मार्च 2022 पर्यंत वाढवली तारीख – The deadline of linking Pan Card with Aadhaar Card is extended till 31 March 2022 :
एका मेसेजद्वारे करता येतील आधार-पॅन लिंक:
* यासाठी तुम्हाला तुमच्या फोनमध्ये UIDPAN टाईप करावे लागेल. यानंतर, तुम्हाला स्पेस देत तुमचा आधार क्रमांक आणि नंतर स्पेस देत पॅन क्रमांक टाकावा लागेल.
* उदाहरणार्थ – UIDPAN 0000011112222 AAAPA7777Q 567678 किंवा 56161 वर पाठवायचे आहे.
* यानंतर आयकर विभाग तुमचे दोन्ही नंबर लिंक करण्याच्या प्रक्रियेत ठेवेल.
ऑनलाइन लिंक करता येतील आधार-पॅन:
* सर्वप्रथम प्राप्तिकर विभागाच्या अधिकृत वेबसाइट https://www.incometax.gov.in/iec/foportal भेट द्या
* यामध्ये आधार लिंकचा पर्याय मिळेल. त्यावर क्लिक केल्यास एक नवीन पान उघडेल.
* यामध्ये तुम्हाला पॅन नंबर, आधार क्रमांक आणि आधार कार्डमध्ये असलेले नाव टाका आणि नंतर आधार लिंकवर क्लिक करा.
* यानंतर आयकर विभाग तुमचे दोन्ही नंबर लिंक करण्याच्या प्रक्रियेत ठेवेल.
PAN Card & Aadhaar Card linking deadline extended, if not linked by this date, your PAN Card may become inoperative :
पॅनला आधारशी लिंक करणे आवश्यक का आहे?
* जर एखाद्या व्यक्तीने आपले पॅन आधारशी लिंक केले नाही तर त्याला अधिक टीडीएस भरावा लागेल.
* जर पॅनला आधारशी लिंक केले नाही तर पॅन निष्क्रिय घोषित केले जाईल.
* आधार-पॅन न जोडल्यामुळे तुमचे बँक खाते फ्रीज होऊ शकते.
* जरी तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल तरी आधारला पॅनशी जोडणे आवश्यक आहे.
पॅन होणार निष्क्रीय:
इनकम टॅक्स विभागाने म्हटले आहे की, जर एखाद्या पॅन होल्डर्सने आपले पॅन आधारला लिंक केले नाही तर तुमचे पॅन निष्क्रीय होईल. यानंतर तुमचे कोणतेही व्यवहार होणार नाही.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.
News Title: The deadline of linking Pan Card with Aadhaar Card is extended till 31 March 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
NTPC Green Energy Share Price | 107 रुपयांचा शेअर 150 रुपये टार्गेट प्राईस गाठणार; अशी संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN
-
Suzlon Share Price | तब्बल 2391 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा मालामाल करणार; फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर प्राईसची दिशा ठरली, बिनधास्त खरेदी करावा असा शेअर - NSE: BEL
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
IRFC Share Price | मल्टिबॅगर रेल्वे स्टॉक मालामाल करणार, शॉर्ट टर्म अपसाईड टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC