15 December 2024 5:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये
x

Supreme Industries Share Price | मार्ग श्रीमंतीचा! सुप्रीम आयुष्याचा आनंद देत आहे सुप्रीम इंडस्ट्रीज शेअर, 30348% परतावा, डिटेल्स सेव्ह करा

Supreme Industries Share Price

Supreme Industries Share Price | वॉरन बफेट हे अमेरिकेतील एक दिग्गज गुंतवणुकदार आणि व्यावसायिक आहेत. गुंतवणूक गुरु म्हणून त्यांची जगभरात ख्याती आहे. ते गुंतवणूकदारांना मार्गदर्शन करण्याचे काम देखील करतात. त्यांचे एक वाक्य प्रसिद्ध आहे, “जर तुम्ही 10 वर्षासाठी स्टॉक होल्ड करु शकत नसाल, तर 10 मिनिटे देखील ठेवण्याचा विचार करू नका”.

म्हणजेच त्यांचे म्हणणे आहे की, जर तुम्ही दीर्घ काळासाठी गुंतवणूक करू शकत नसाल तर तुम्ही अल्पावधीसाठी देखील स्टॉक होल्ड करु नये जेव्हा तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करता, तेव्हा तुमचं दृष्टिकोन दीर्घ काळ असला पाहिजे. दीर्घ कालावधीत शेअर धारकांना मजबूत नफा मिळतो. असाच परतावा देणारा एक स्टॉक महणेज, सुप्रीम इंडस्ट्रीज.

शेअरची कामगिरी :

मागील वीस वर्षात सुप्रीम इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 30348 टक्के नफा कमावून दिला आहे. या काळात शेअरची किंमत 13.50 रुपयेवरून वाढून 4070 रुपये गेली आहे. जर तुम्ही वीस वर्षांपूर्वी सुप्रीम इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 3.01 कोटी रुपये झाले असते.

मागील या पाच वर्ष आणि एक वर्षाच्या कालावधीत सुप्रीम इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर नफा कमावून दिला आहे. बुधवार दिनांक 16 ऑगस्ट 2023 रोजी सुप्रीम इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 2.88 टक्के वाढीसह 4,259.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

गुंतवणुकीवर परतावा :

मागील पाच वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 257.40 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने लोकांना 124.17 टक्के परतावा कमावून दिला आहे. सुप्रीम इंडस्ट्रीज ही कंपनी प्लास्टिक उत्पादन करण्याचा व्यवसाय करते. कंपनीचे भारतात एकूण 25 उत्पादन केंद्र सुरू आहेत. ही कंपनी मुख्यतः प्लॅस्टिक पाईपिंग सिस्टम, क्रॉस-लॅमिनेटेड फिल्म आणि उत्पादने, संरक्षक पॅकेजिंग उत्पादने, औद्योगिक मोल्ड केलेले घटक, मोल्ड केलेले फर्निचर आणि संमिश्र एलपीजी सिलिंडर, यांचे उत्पादन करण्याचा व्यवसाय करते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Supreme Industries Share Price today on 16 August 2023.

हॅशटॅग्स

Supreme Industries Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x