
Titagarh Rail Systems Share Price | टिटागढ रेल सिस्टीम वॅगन्स कंपनीच्या समभागांनी बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये नवीन उच्चांक किंमत स्पर्श केली आहे. मात्र आज स्टॉकमध्ये किंचित प्रॉफिट बुकींग पाहायला मिळत आहे. बुधवारी सुरुवातीच्या काही तासात टिटागढ रेल सिस्टीम वॅगन्स कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 529.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
शेअर्समध्ये अचानक वाढ होण्याचे कारण म्हणजे कंपनीला काही मोठ्या ऑर्डर प्राप्त झाल्या आहेत. टिटागढ रेल सिस्टीम वॅगन्स कंपनीला गुजरात मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून 857 कोटी रुपये मूल्याचे कंत्राट देण्यात आले आहे. आज शुक्रवार दिनांक 30 जून 2023 रोजी टिटागढ रेल सिस्टीम वॅगन्स कंपनीचे शेअर्स 1.78 टक्के वाढीसह 500.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
कंत्राट तपशील
टिटागढ रेल सिस्टीम वॅगन्स कंपनीने स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये कळवले आहे की, कंपनीला एकूण 857 कोटी रुपयेची ऑर्डर मिळाली आहे. टिटागढ रेल सिस्टीम वॅगन्स कंपनीला सुरत मेट्रो रेल फेज -1 प्रोजेक्ट साठी 72 स्टँडर्ड गेज गाड्यांचे डिझाइन, उत्पादन, पुरवठा, चाचणी, कमिशनिंग आणि प्रशिक्षण संबंधित कंत्राट देण्यात आले आहे. या करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर 76 आठवड्यांनंतर याची अंमलबजावणी सुरू केली जाईल. त्यानंतर टिटागढ रेल सिस्टीम वॅगन्स कंपनीला किमान 132 आठवड्यात सर्व काम पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली आहे.
टिटागढ रेल सिस्टीम वॅगन्स कंपनीचे शेअर्स मल्टीबॅगर मागील ट्रेडिंग सेशनमध्ये 4.67 टक्क्यांच्या वाढीसह 529.20 रुपये या नवीन उच्चांक किमतीवर पोहचले होते. मागील एका वर्षात टिटागढ रेल सिस्टीम वॅगन्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 390.20 टक्के परतावा कमावून दिला आहे. दरम्यान कॅलेंडर वर्ष 2023 मध्ये या कंपनीच्या शेअरने लोकांना 120.31 टक्के परतावा कमावून दिला आहे. त्या तुलनेत S&P BSE सेन्सेक्समध्ये फक्त 4 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे.
कॅलेंडर वर्ष 2022 मध्ये टिटागढ रेल सिस्टीम वॅगन्स कंपनीच्या शेअरने लोकाना 140 टक्के परतावा कमावून दिला आहे. अँटिक स्टॉक ब्रोकिंग फर्मच्या तज्ज्ञांच्या मते टिटागढ रेल सिस्टीम वॅगन्स कंपनीने एक मॅन्युफॅक्चरिंग सेटअप तयार केले असून पुढील पाच वर्षांत कंपनीचा व्यवसाय 9,000-10,000 कोटी रुपयेपर्यंत वाढू शकतो.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.