
Titan Company Share Price | मागील काही काळापासून टाटा उद्योग समूहाचा भाग असेलल्या ‘टायटन लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स मंदीच्या छायेत ट्रेड करत आहेत. मात्र आता या स्टॉकमध्ये तेजी पाहायला मिळू शकते, असे तज्ञ म्हणतात. जागतिक ब्रोकरेज फर्म जेपी मॉर्गनने ‘टायटन लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. जेपी मॉर्गनच्या अहवालानुसार मार्च 2024 पर्यंत ‘टायटन लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 3000 रुपये किंमत पातळी स्पर्श करू शकतात. (Titan Company Limited)
शेअरची सध्या किंमत :
मागील आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टायटन कंपनीचे शेअर्स 2470 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज सोमवार दिनांक 20 मार्च 2023 रोजी ‘टायटन लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 0.28 घसरणीसह 2,448.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ब्रोकरेज फर्मने अंदाज व्यक्त केला आहे की, ‘टायटन लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स पुढील काळात 20 टक्क्यांहून अधिक वाढू शकतात.
जेपी मॉर्गन फर्मने आपल्या म्हटले आहे की, ‘टायटन लिमिटेड’ कंपनीचा मार्जिन 12-13 टक्क्यांवर स्थिर राहण्याची अपेक्षा आहे. सध्याच्या वातावरणात तुलनेने किमान नकारात्मक जोखमीसह कंपनीची कमाई वाढण्याची शक्यता आहे. तथापि आनंद राठी फर्मचे तज्ञ म्हणाले की, चार्ट पॅटर्नवर टायटन कंपनीचे शेअर्स 2300 रुपये ते 2600 रुपये पर्यंत वाढू शकतात. एकदा जर स्टॉकने 2600 रुपयेचा अडथळा तोडला तर तो जबरदस्त तेजीत वाढेल. ज्यांच्याकडे हा स्टॉक आहे ते 2300 रुपये प्रति शेअर किमतीवर स्टॉप लॉस लावून वाट पाहू शकतात. भारतीय शेअर बाजारातील अस्थिरता लक्षात घेता ‘टायटन लिमिटेड’ स्टॉक 2300 रुपये प्रति शेअर किंमत पातळीच्या खाली गेला तर तो 2000 रुपये हा पुढचा मजबूत सपोर्ट स्पर्श करेल.
रेखा झुनझुनवाला यांची गुंतवणूक :
भारतीय शेअर बाजारात बिग बुल म्हणून प्रसिद्ध असलेले दिवंगत गुंतवणुकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी ‘रेखा झुनझुनवाला’ यांनी ‘टायटन लिमिटेड’ स्टॉकमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. डिसेंबर 2022 तिमाहीचे चार्ट पॅटर्न पाहिले तर तुम्हाला समजेल की, रेखा झुनझुनवाला यांच्याकडे टायटन कंपनीचे एकूण 4,58,95,970 शेअर्स आहेत. ज्याचे प्रमाण कंपनीच्या एकूण पेड अप कॅपिटलच्या तुलनेत 5.17 टक्के आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.