 
						Titan Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टायटन कंपनीने कॅरेटलेन कंपनीचे 0.36 टक्के भाग भांडवल 60.08 कोटी रुपये किमतीवर खरेदी केले आहे. टायटन कंपनीकडे यापूर्वीच कॅरेटलेन कंपनीचे 99.64 टक्के भाग भांडवल होते. उर्वरित वाटा खरेदी केल्यानंतर कॅरेटलेन कंपनी टायटन कंपनीची पूर्ण मालकीची उपकंपनी बनेल.
टायटन कंपनीने स्टॉक मार्केट नियामक फाइलिंगमध्ये माहिती दिली की, कॅरेटलेन ही टायटन कंपनीची उपकंपनी होती, ज्यामध्ये कॅरेटलेनच्या एकूण पेड-अप भांडवलापैकी 99.64 टक्के भाग भांडवल टायटन कंपनीने धारण केले होते. आता प्रस्तावित उर्वरित भाग भांडवल खरेदीमुळे कॅरेटलेन कंपनीचा 100 टक्के ताबा टायटन कंपनीकडे येईल. आज गुरूवार दिनांक 29 फेब्रुवारी 2024 रोजी टायटन कंपनीचे शेअर्स 0.59 टक्के वाढीसह 3,615.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
कॅरेटलेन आणि टायटन कंपनीचा व्यवहार 31 मार्च 2024 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात कॅरेटलेन कंपनीने 2177 कोटी रुपयेची उलाढाल केली होती. या कंपनीने 2021 मध्ये अनुक्रमे 723 कोटी रुपये आणि 2022 मध्ये 1,267 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. ही कंपनी मुख्यतः दागिन्यांची निर्मिती आणि विक्री संबंधित व्यवसाय करते. या कंपनीच्या अधिकृत खरेदीच्या घोषणेनंतर टायटन कंपनीचे शेअर्स एक टक्के वाढीसह 3652.55 रुपये किमतीवर ट्रेड मात्र होते.
नुकताच देशांतर्गत ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालच्या तज्ञांनी टायटन कंपनीच्या शेअर्सवर ‘बाय’ रेटिंग जाहीर केली आहे. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 4200 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. टायटन कंपनीने डिसेंबर तिमाहीत 1,040 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. मागील वर्षीच्या तुलनेत कंपनीच्या निव्वळ नफ्यात 9.4 टक्के वाढ नोंदवली गेली होती. डिसेंबर तिमाहीत टायटन कंपनीचे कामकाजी उत्पन्न वार्षिक आधारावर 10,875 कोटी रुपयेवरून 20 टक्के वाढीसह 13,052 कोटी रुपये नोंदवले गेले आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		