
Trent Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या ट्रेंट कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ट्रेंट कंपनीचे शेअर्स 8 टक्क्यांच्या वाढीसह 4670 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सोमवारी ट्रेंट कंपनीचा शेअर 4314 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. ( ट्रेंट कंपनी अंश )
मागील 5 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 1100 टक्के परतावा कमावून दिला आहे. मार्च निकालानंतर अनेक ब्रोकरेज हाऊसेस ट्रेंट स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. आज गुरूवार दिनांक 2 मे 2024 रोजी ट्रेंट कंपनीचे शेअर्स 4.45 टक्के वाढीसह 4,606 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
शेअर बाजारातील प्रसिद्ध गुंतवणूकदार आणि उद्योगपती राधाकिशन दमानी यांच्या देखील पोर्टफोलिओमध्ये ट्रेंट कंपनीचे शेअर्स सामील आहेत. त्यांनी या कंपनीचे 1 टक्क्यांपेक्षा कमी शेअर्स होल्ड केले आहेत. मागील 1 वर्षात ट्रेंट कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 217 टक्के परतावा कमावून दिला आहे.
मागील 5 वर्षात या कंपनीचे शेअर्स 1100 टक्के मजबूत झाले आहेत. मागील 5 वर्षांत ट्रेंट कंपनीच्या शेअरची किंमत 384 रुपयेवरून वाढून 4670 रुपये किमतीवर पोहचली आहे. मार्च 2024 तिमाहीत ट्रेंट कंपनीचा महसूल वार्षिक आधारावर 51 टक्क्यांच्या वाढीसह 3298 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. मागील वर्षी ट्रेंट कंपनीने 2183 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. सध्या अनेक तज्ञांनी ट्रेंट कंपनीच्या शेअर्सवर टारगेट प्राइस अपडेट केली आहे. नूवामा ब्रोकिंग फर्मने हा शेअर खरेदीचा सल्ला देताना पुढची टार्गेट प्राईस 4926 रुपये निश्चित केली आहे. विविध ब्रोकरेज फर्मचा सल्ला खालील प्रमाणे आहे.
आयआयएफएल
* रेटिंग : खरेदी
* टारगेट प्राइस : 4720 रुपये
मोतीलाल ओसवाल
* रेटिंग : खरेदी
* टारगेट प्राइस : 4870 रुपये
आयसीआयसीआय सिक्युरिटीज
* रेटिंग : होल्ड
* टारगेट प्राइस : 4200 रुपये
अँटीक स्टॉक ब्रोकिंग
* रेटिंग: खरेदी
* टारगेट प्राइस : 4876 रुपये
Equirus सिक्युरिटीज
* रेटिंग: ADD
* टारगेट प्राइस : 4719 रुपये
सेंट्रम ब्रोकिंग
* रेटिंग: ADD
* टारगेट प्राइस : 4564 रुपये
फिलिप कॅपिटल
* रेटिंग: खरेदी
* टारगेट प्राइस : 4771 रुपये
नूवामा
* रेटिंग: खरेदी
* टारगेट प्राइस : 4926 रुपये
मॉर्गन स्टॅनली
* रेटिंग: न्युट्रल
* टारगेट प्राइस : 3675 रुपये
जेफरीज
* रेटिंग: खरेदी
* टारगेट प्राइस : 4150 रुपये
ब्रोकरेज हाऊस मोतीलाल ओसवालच्या तज्ञांच्या मते, ट्रेंट कंपनीने मार्च तिमाहीत स्टँडअलोन कमाईत 53 टक्के वाढ नोंदवली आहे. GM आणि ऑपरेटिंग लिव्हरेजमधील सुधारणामुळे आणि महसूल वाढीमुळे कंपनीचा EBITDA आणि PAT अनुक्रमे 2.3x आणि 2.4x नी वाढला आहे. मागील आर्थिक वर्षात ट्रेंट कंपनीला RM किमतींतील तीव्र वाढीचा फटका सहन करावा लागला होता.
ब्रोकरेज हाऊस ICICI सिक्युरिटीजच्या अहवालानुसार मागील तीन तिमाहीत ट्रेंट स्टॉक 10 टक्के SSSG प्रभावशाली आहे. कंपनीच्या रिटेल व्यवसायातील वाढ अपेक्षेनुसार आहे. ट्रेंट कंपनीने आपल्या पोर्टफोलिओमध्ये 203 नवीन झुडिओ स्टोअर्स आणि 30 वेस्टसाइड स्टोअर्स जोडले आहेत.
झुडिओ स्टलर्सचे ट्रेंट कंपनीतील महसूल योगदान आता 53 टक्केवर पोहचले आहे. आर्थिक वर्ष 2025-26 पर्यंत ट्रेंट कंपनी 400+ स्टोअर्स जोडण्याची योजना आखत आहे. तज्ञांच्या मते, झुडिओ पुढील 7 वर्षांत 2000 स्टोअर्स ओपन करेल. झुडिओमुळे ट्रेंट कंपनीचा ROIC सुधारला आहे. कंपनीचे लीज एसेट म्हणजेच लायबिलिटीजच्या रीएसेसमेंटमुळे कंपनीचा असाधारण लाभ अस्थायी आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.