
Trent Share Price Today | टाटा उद्योग समूहाचा भाग असलेल्या ‘ट्रेंट लिमिटेड’ या रिटेल कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत अनेक प्रलंबित प्रस्तावांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीत कंपनी आपल्या शेअर धारकांना लाभांश वाटप करण्याचा निर्णय देखील घेऊ शकते. त्याच वेळी ब्रोकरेज फर्म ‘ट्रेंट लिमिटेड’ कंपनीच्या स्टॉकबाबत उत्साही पाहायला मिळत आहे. सोमवार दिनांक 17 एप्रिल 2023 रोजी ‘ट्रेंट लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 0.29 टक्के घसरणीसह 1,357.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Trent Limited)
संचालक मंडळाच्या बैठकीचे तपशील :
‘ट्रेट लिमिटेड’ कंपनीने सेबीला दिलेल्या माहिती म्हंटले आहे की, कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 27 एप्रिल 2023 रोजी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत 31 मार्च 2023 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाच्या कामगिरीचे निरीक्षण केले जाईल, आणि तिमाही निकाल जाहीर केला जाईल. यासोबतच कंपनीचे संचालक लाभांशही जाहीर करू शकतात.
तज्ञांचे मत :
शेअरखान फर्मच्या अहवालानुसार ट्रेंट लिमिटेड कंपनीचे शेअर्स पुढील काळात मजबूत वाढू शकतात. कंपनीची कामगिरी विचारात घेता तज्ञांनी या कंपनीच्या शेअरची लक्ष्य किंमत 1550 रुपये जाहीर केली आहे. अनेक ब्रोकरेज फर्मने हा स्टॉक खरेदी करण्याची शिफारस केली आहे. आज हा स्टॉक 1,357.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 1571.00 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 983.70 रुपये होती.
या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 48,390 कोटी रुपये आहे. ट्रेंट लिमिटेड ही एक भारतातील एक आघाडीची रिटेल चेन कंपनी असून ती कपड़े, शूज, आणि उपकरणे इत्यादींची रिटेल विक्री करण्याचा व्यवसाय करते. या कंपनीची स्थापना 1952 साली झाली होती.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.