
Trident Share Price | ट्रायडेंट टेकलॅब या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअर्सने मागील 4 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. ट्रायडेंट टेकलॅब कंपनीचा आयपीओ 4 महिन्यांपूर्वी 35 रुपये किंमतीवर लाँच करण्यात आला होता. 12 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 240 रुपये किमतीच्या पार गेले आहेत. ( ट्रायडेंट टेकलॅब कंपनी अंश )
ट्रायडेंट टेकलॅब कंपनीचे शेअर्स 35 रुपये इश्यू किमतीच्या तुलनेत 593 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 291.80 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 93.25 रुपये होती. आज सोमवार दिनांक 15 एप्रिल 2024 रोजी ट्रायडेंट टेकलॅब कंपनीचे शेअर्स 1.04 टक्के घसरणीसह 240 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
ट्रायडेंट टेकलॅब कंपनीचे शेअर्स 35 रुपयेवरून वाढून 240 रुपये किमतीच्या पार गेले आहेत. या कंपनीचा IPO 21 डिसेंबर 2023 ते 26 डिसेंबर 2023 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. 29 डिसेंबर 2023 रोजी ट्रायडेंट टेकलॅब कंपनीचे शेअर्स 98.15 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते.
लिस्टिंगच्या दिवशी या कंपनीचे शेअर्स 103.05 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ट्रायडेंट टेकलॅब कंपनीचे शेअर्स IPO इश्यू किंमतीच्या तुलनेत 195 टक्क्यांनी वाढले आहेत. 12 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 242.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
ट्रायडेंट टेकलॅब कंपनीचा IPO एकूण 763.30 पट अधिक सबस्क्राईब झाला होता. या कंपनीच्या IPO मध्ये किरकोळ गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 1059.43 पट अधिक सबस्क्राईब झाला होता. गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 854.37 पट अधिक सबस्क्राईब झाला होता. तर क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्सचा राखीव कोटा 117.91 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. या कंपनीने आपल्या IPO मध्ये एका लॉट अंतर्गत 4000 शेअर्स ठेवले होते. किरकोळ गुंतवणूकदारांना एक लॉट खरेदी करण्यासाठी 140000 रुपये जमा करावे लागले होते. या कंपनीच्या IPO चा आकार 16.03 कोटी रुपये होता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.