
TRIL Share Price | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. ट्रान्सफॉर्मर्स अँड रेक्टिफायर्स इंडिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स गुंतवणुकीसाठी आकर्षक वाटत आहे. ( ट्रान्सफॉर्मर्स अँड रेक्टिफायर्स इंडिया लिमिटेड कंपनी अंश )
मागील एका वर्षात ट्रान्सफॉर्मर्स अँड रेक्टिफायर्स इंडिया लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 770 टक्के परतावा कमावून दिला आहे. बुधवार दिनांक 10 एप्रिल 2024 रोजी ट्रान्सफॉर्मर्स अँड रेक्टिफायर्स इंडिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स 3.77 टक्के वाढीसह 517 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
नुकताच या कंपनीने आपले आर्थिक वर्ष 2023-24 च्या जानेवारी-मार्च तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. मार्च तिमाहीत या कंपनीने 4 पट वाढीसह 41.62 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. आर्थिक वर्ष 2022-23 च्या याच तिमाहीत कंपनीने 9.60 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.
आर्थिक वर्ष 2023-24 च्या मार्च तिमाहीत कंपनीने 514 कोटी रुपये महसूल संकलन केले आहे. तर मागील वर्षीच्या याच तिमाहीत कंपनीने 439.50 कोटी रुपये महसूल संकलित केला होता 2023-24 या आर्थिक वर्षात ट्रान्सफॉर्मर्स अँड रेक्टिफायर्स इंडिया लिमिटेड कंपनीने एकूण 47.01 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. तर 2022-23 या आर्थिक वर्षात कंपनीने 42.35 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.
मागील 12 ट्रेडिंग सेशनपासून ट्रान्सफॉर्मर्स अँड रेक्टिफायर्स इंडिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स सातत्याने वाढत आहेत. 10 एप्रिल 2023 रोजी ट्रान्सफॉर्मर्स अँड रेक्टिफायर्स इंडिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स 59.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 517 रुपये किमतीवर पोहचला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 770 टक्के परतावा कमावून दिला आहे.
जर तुम्ही एका वर्षभरापूर्वी या कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 869,638 रुपये झाले असते. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 57 टक्क्यांनी मजबूत झाली आहे. तर मागील सहा महिन्यांत या कंपनीचे शेअर्स 204 टक्के वाढले आहेत. 2024 या वर्षात ट्रान्सफॉर्मर्स अँड रेक्टिफायर्स इंडिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स 116 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.