14 June 2024 1:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 14 जून 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 14 जून 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या NBCC Share Price | सरकारी शेअरने अल्पावधीत दिला 900% परतावा, ऑर्डरबुक मजबूत, पुढेही मल्टिबॅगर Reliance Power Share Price | शेअर प्राईस 30 रुपये! 5 दिवसात दिला 34% परतावा, गुंतवणुकीची संधी सोडू नका RVNL Share Price | RVNL स्टॉक देणार ब्रेकआऊट, PSU शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉकबाबत तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, स्टॉक 'BUY' करावा की 'Sell'? Reliance Infra Share Price | स्टॉक रॉकेट स्पीडमध्ये परतावा देणार, 5 दिवसात दिला 30% परतावा, खरेदीला गर्दी
x

TTK Prestige Share Price | लॉटरी शेअर! या शेअरने 55000 रुपयांच्या गुंतवणुकीवर करोडपती केले, शेअरची कामगिरी आणि परतावा पहा

TTK Prestige Share Price

TTK Prestige Share Price | ‘टीटीके प्रेस्टीज’ या किचन संबंधित वस्तू बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स जबरदस्त विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करत आहेत. 14 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.69 टक्के घसरणीसह 730.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. तथापि दीर्घ कालावधीत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. अवघ्या 55,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर या स्टॉकने गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. भविष्यातही या स्टॉकमध्ये तेजी कायम राहण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजच्या मते, या कंपनीचे शेअर्स सध्याच्या किंमत पातळीपेक्षा 35 टक्के अधिक वाढू शकतात.

स्टॉकबाबत तज्ञांचे मत :
टीटीके ही संथ गतीने वाढणारी कंपनी आहे. कंपनीचा EBITDA आर्थिक वर्ष 2012-2017 मध्ये फक्त 4.3 टक्के होता. मात्र, त्यानंतर 2017-18 या आर्थिक वर्षात EBITDA 14.3 टक्के वाढला. कंपनीच्या EBITDA मध्ये झालेली ही जलद वाढ वितरणाचा सतत विस्तार, दक्षिण भारतातून उत्तर भारतात व्यापार विस्तार, नवीन उत्पादने लॉन्च केल्यामुळे झाली आहे. ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजच्या मते, आर्थिक वर्ष 2023-25 या काळात ​​कंपनीचा महसूल 13.3 टक्के CAGR असेल. आणि कंपनीची कमाई 24.4 टक्के CAGR ने वाढेल. म्हणून ब्रोकरेज फर्मने या कंपनीच्या स्टॉकवर 1,000 रुकये लक्ष्य किंमत निश्चित केली असून स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

टीटीके प्रेस्टीज मल्टीबॅगर परतावा :
18 मार्च 2005 रोजी ‘TTK प्रेस्टीज’ कंपनीचे शेअर्स 3.99 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. स्टॉक 186 पटीने वाढून 730 रुपये किमतीवर पोहचला आहे. याचा अर्थ ज्या लोकांनी या स्टॉकमध्ये 55,000 रुपयांची गुंतवणुक केली होती, ते लोक अवघ्या 18 वर्षात करोडपती झाले आहेत. 13 सप्टेंबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 1051 रुपये या आपल्या वार्षिक उच्चांक पातळीवर ट्रेड करत होते. तथापि स्टॉकची रॅली येथेच थांबली आणि अवघ्या 4 महिन्यांत शेअर 34 टक्क्यांनी कमजोर होऊन 694.75 रुपयांपर्यंत खाली आला. हा स्टॉक सध्या वार्षिक उच्चांक किंमत पातळीच्या 29 टक्के खाली ट्रेड करत आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | TTK Prestige Share Price return on investment check details on 14 March 2023.

हॅशटॅग्स

#TTK Prestige Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x