
TTML Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड म्हणजेच टीटीएमएल कंपनीच्या शेअर्समध्ये बुधवारी जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती. टीटीएमएल कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 3 टक्के घसरणीसह 77.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. टीटीएमएल कंपनीच्या शेअरची उच्चांक पातळी किंमत 149.95 रुपये होती. या किमतीवरून स्टॉक 49 टक्के कमजोर झाला आहे.
टीटीएमएल कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 49.80 रुपये होती. आज शुक्रवार दिनांक 4 ऑगस्ट 2023 रोजी टीटीएमएल कंपनीचे शेअर्स 0.32 टक्के वाढीसह 78.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
शेअरची कामगिरी :
29 मार्च 2023 रोजी टीटीएमएल कंपनीचे शेअर्स आपल्या 52 आठवड्याच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. टीटीएमएल कंपनीच्या शेअरची किंमत मागील एका वर्षात 30 टक्के कमजोर झाली आहे. YTD आधारे या कंपनीच्या शेअरने आल्या गुंतवणूकदारांचा 14.00 टक्के तोटा केला आहे. मागील एका महिन्यात टीटीएमएल कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 3.95 टक्के नफा कमावून दिला आहे. 11 जानेवारी 2022 रोजी टीटीएमएल कंपनीचे शेअर्स 291.05 रुपये या आपल्या सर्वकालीन उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. सध्या हा स्टॉक आपल्या लाइफ टाइम हाय किमतीच्या तुलनेत 74 टक्के खाली ट्रेड करत आहे.
कंपनीबद्दल थोडक्यात :
टीटीएमएल ही कंपनी Tata Teleservices ची उपकंपनी म्हणून ओळखली जाते. ही कंपनी आपल्या मार्केट सेगमेंटमध्ये लीडर मानली जाते. टीटीएमएल कंपनी आपल्या ग्राहकांना व्हॉईस डेटा सेवा प्रदान करण्याचे काम करते. टीटीएमएल कंपनीच्या ग्राहकांच्या यादीत अनेक दिग्गज कंपन्या सामील आहेत. मार्च 2023 तिमाहीत टीटीएमएल कंपनीने 280 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. तर कंपनीला 277 कोटी रुपये निव्वळ तोटा सहन करावा होता.
एक वर्षभरापूर्वीच्या मार्च तिमाहीच्या तुलनेत निव्वळ तोट्यात किंचित सुधारणा पाहायला मिळत आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात टीटीएमएल कंपनीने 1,106.17 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. आणि कंपनीला एकूण 1144 कोटी रुपये निव्वळ तोटा सहन करावा लागला होता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.