 
						TTML Share Price | टाटा ग्रुपचा भाग असलेल्या टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड म्हणजेच टीटीएमएल शेअर्समध्ये कमालीची उलाढाल पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टीटीएमएल कंपनीचे शेअर्स 6 टक्क्यांच्या घसरणीसह ट्रेड करत होते. दिवसा अखेर हा स्टॉक 5.25 टक्के घसरणीसह 76 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.
मागील काही दिवसांपासून टीटीएमएल कंपनीच्या स्टॉकमध्ये कमालीची तेजी पाहायला मिळत होती. यामुळे सेबीने देखील कंपनीला स्टॉक वाढीचे कारण विचारले होते. आज गुरूवार दिनांक 15 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.48 टक्के वाढीसह 79.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
सेबीकडून चौकशी
13 जून 2023 रोजी सेबीने टीटीएमएल कंपनीच्या शेअर्समधील वाढीच्या पार्श्वभूमीवर कंपनीकडून स्पष्टीकरण मागवले होते. 14 जून रोजी TTML कंपनीने माहिती दिली की, कंपनीने कोणत्याही घटना किंवा नवीन गोष्टीबद्दल सेबीला त्वरित माहिती कळवली आहे.
सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या लिस्टिंग ऑब्लिौशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स रेग्युलेशन ॲक्ट, 2015 अंतर्गत खाजगी सूचीबद्ध कंपनीने सेबीला सर्व घडामोडींची माहिती देणे बंधनकारक आहे. टीटीएमएल कंपनीने सर्व प्रकारची माहिती सेबीला वेळोवेळी कळवली असल्याची माहिती दिली आहे.
शेअरची कामगिरी
टीटीएमएल स्टॉकने सेन्सेक्सच्या तुलनेत मागील एका वर्षात लोकांना 43 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. मागील सहा महिन्यांच्या आणि एक वर्षाच्या आधारावर टीटीएमएल शेअर अनुक्रमे 24 टक्के, 18 टक्क्यांनी कमजोर झाले आहेत.
मागील तीन महिन्याच्या कालावधीत टीटीएमएल स्टॉक 28 टक्के आणि मागील एका महिन्यात 23 टक्के वाढ कमजोर झाले होते. मागील वर्षी जानेवारी 2022 मध्ये TTML कंपनीचे शेअर्स 290 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज हा स्टॉक 79.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. म्हणजेच शेअर आपल्या उच्चांक किमतीच्या तुलनेत 74 टक्के खाली ट्रेड करत आहे.
मार्च तिमाही निकाल
टीटीएमएल कंपनीने मार्च तिमाहीत 280 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. त्याच वेळी कंपनीला 277 कोटी रुपये निव्वळ तोटा सहन करावा लागला होता. एक वर्षभरापूर्वीच्या कालावधीच्या तुलनेत कंपनीच्या निव्वळ तोट्यात किंचित सुधारणा पाहायला मिळाली आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात टीटीएमएल कंपनीने 1,106 17 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. या काळात कंपनीला 1144 कोटी रुपये निव्वळ तोटा सहन करावा लागला होता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		