 
						UPI PIN Update | यूपीआय पिन मार्फत आज सर्वच व्यवहार सहज शक्य झाले आहेत. याचा सर्वात जास्त फायदा म्हणजे कितीही दूर असलेल्या व्यक्तीला आपण या पिन मार्फत पैसे पाठवू शकतो. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने जाहिर केलेल्या अहवालानुसार यूपीआयने सप्टेंबर २०२२ रोजी ११ लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.
मात्र यूपीआय पिनचा वापर करताना अनेक व्यक्ती आपला पिन क्रमांक विसरून जातात. त्यामुळे त्यांना पुन्हा युपीआय पीन जनरेट करावा लागतो. यासाठी डेबीटकार्ड खूप गरजेचे असते. डेबीटकार्ड नसल्यास आपल्याला अनेक अडचणी येतात. मात्र आता डेबीटकार्ड शिवाय पिन जनरेट करण्याचा पर्याय सापडला आहे.
यूपीआय पिनचा वापर अनेक ऍपमध्ये केला जातो. यात तुमच्या बॅंक अकाऊंटला लिंक असलेले खाते हे पेटीएम, फोनपे, गूगल पे अशा इत्यादी ऍपवर प्रविश्ट केलेले असते. त्याच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार सोपे होतात.
जेव्हा यूपाआय पिनचा विसर पडतो तेव्हा तो भिम ऍप, गूगल पे, फोन पे, पेटीएम मार्फत परत मिळवता येतो. यासाठी तुमचे अकाउंट ज्या बॅंकेत लिंक आहे ते निवडावे लागते. त्यानंतर तुमचे डेबीडकार्ड तपशील टाकावे लागतात. मात्र डेबीटकार्ड शिवाय जर पिन रिसेट करायचा असेल तर फॉरगेट पिन केल्यावर आधिचा पिन सेट करताना पेटीएमवर तुमच्या डेबीटकार्डचे तपशिल असल्यास ते पुन्हा नमुद करावे लागत नाहीत.
असा बदला यूपीआय पिन
* आधी कोणत्याही पेमेंट ऍपमध्ये जा आणि प्रोफाईलवर क्लिक करा.
* यूपीआय आणि पेमेंट सेटींगमध्ये प्रवेश करा.
* बॅंक खाते निवडा आणि चेंज पिन ऑप्शन सिलेक्ट करा.
* आय रिमेंबर माय ओल्ड पिन निवडा आणि पिन क्रमांक टाका.
* आता एक नविन आणि आधी पेक्षा पूर्ण वेगळा पिन तयार तरा आणि चेंजवर क्लिक करा.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		