 
						Urja Global Share Price | मागील एका आठवड्यापासून भारतीय शेअर बाजारात कमालीची उलाढाल पाहायला मिळत आहे. मोठ्या स्टॉकमधे अस्थिरता पाहायला मिळत आहे, तर दुसरीकडे स्मॉल कॅप स्टॉक तेजीत धावत आहेत. शेअर बाजारातील 3 स्मॉल ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त कमाई करून दिली आहे. या स्टॉकची किंमत 21 रुपयांपेक्षा ही कमी आहे. आज लेखात आपण या पॉवरफुल स्टॉक बद्दल जाणून घेणार आहोत. या स्टॉकचे नाव आहे, SE पॉवर, उर्जा ग्लोबल, आणि सुझलॉन एनर्जी.
मागील एका आठवड्यात 56 टक्के परतावा दिला
या तीन स्मॉल कॅप कंपनीच्या शेअरने मागील एका आठवड्यात आपल्या गुंतवणुकदारांना 34 ते 56 टक्के नफा मिळवून दिला आहे. सुझलॉन एनर्जी या पवन ऊर्जा क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स मागील अनेक दिवसांपासून अप्पर सर्किट तोडत होते.
मागील एका महिन्यात या शेअरने 71.34 टक्के परतावा दिला
मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने लोकांना 71.34 टक्के परतावा मिळवून दिला आहे. आज बुधवार दिनांक 14 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.97 टक्के घसरणीसह 14.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 15.40 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 5.41 रुपये होती.
मागील 5 दिवसात 20.56 टक्के परतावा दिला
उर्जा ग्लोबल कंपनीचे शेअर्स आज बुधवार दिनांक 14 जून रोजी 5.24 टक्के घसरणीसह 10.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील पाच दिवसात या कंपनीचे शेअर्स 20.56 टक्के वाढले आहेत. तर सोमवारी या कंपनीच्या शेअरने 19.81 टक्के वाढ नोंदवली होती. मागील एका महिन्यात या कंपनीचे शेअर्स 40.91 टक्के वाढले आहेत. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 14.85 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 6 रुपये होती.
एसई पॉवर कंपनीचे शेअर्स आज बुधवार दिनांक 14 जून रोजी 9.95 टक्के वाढीसह 21.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअरने लोकांना 8.84 टक्के परतावा कमावून दिला आहे. सोमवारी हा स्टॉक 10 टक्क्यांच्या वाढीसह 20.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 25.50 रुपये होती. तर नीचांक परकी किंमत 12 रुपये होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		