
Vaarad Ventures Share Price | वाराड वेंचर्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स आपल्या सर्वकालीन उच्चांक किंमत पातळीजवळ पोहचले आहेत. या कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची खरेदी पाहायला मिळत आहे. या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना अल्पावधीत जबरदस्त कमाई करून दिली आहे. (Vaarad Ventures Share Price BSE)
वाराड वेंचर्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 10 टक्के वाढीसह 15.64 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ते आज मंगळवार दिनांक 20 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.95 टक्के वाढीसह 18.67 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
मागील एका वर्षात वाराड वेंचर्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 2.25 टक्के कमजोर झाले होते. 2011 मध्ये या कंपनीचे शेअर्स 88 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. त्यानुसार हा स्टॉक तब्बल 82 टक्के कमजोर झाला आहे. मागील 5 दिवसात वाराड वेंचर्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 60.26 टक्के वाढले आहेत.
मागील एका महिन्यात 103.38 टक्के परतावा
मागील एका महिन्यात वाराड वेंचर्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 103.38 टक्के वाढले आहेत. या काळात शेअरची किंमत 9.70 रुपयांवरून वाढून सध्याच्या किमतीवर पोहोचली आहे. YTD आधारे वाराड वेंचर्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 24.55 टक्के मजबूत झाले आहेत.
कंपनीबद्दल थोडक्यात
वाराड वेंचर्स लिमिटेड ही एक नॉन बँकिंग वित्तीय कंपनी असून, ती तंत्रज्ञान, खनिज, पाणी पुरवठा, सेवा व्यवस्थापन आणि डेटाबेस व्यवस्थापन क्षेत्रात उद्योग करते. ही कंपनी पूर्वी एटको कॉर्पोरेशन लिमिटेड या नावाने मओळखली जात होती, मात्र फेब्रुवारी 2011 मध्ये कंपनीचे नाव बदलून वाराड वेंचर्स लिमिटेड ठेवण्यात आले होते. वाराड वेंचर्स लिमिटेड कंपनीची स्थापना 1993 साली झाली होती. कंपनीचे मुख्यालय मुंबई शहरात स्थित आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.