 
						Vedanta Share Price | भारतीय उद्योगपती ‘अनिल अग्रवाल’ यांच्या मालकीच्या ‘वेदांता’ कंपनीच्या शेअर्समध्ये बुधवारी जबरदस्त वाढ पहायला मिळाली होती. आज गुरूवार दिनांक 16 मार्च 2023 रोजी ‘वेदांता’ कंपनीचे शेअर्स 3.35 टक्के घसरणीसह 271.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ‘वेदांता’ कंपनीच्या शेअर्समध्ये ही अचानक वाढ 100 दशलक्ष डॉलर्सचे कर्ज परतफेड केल्याने झाली आहे. कंपनीच्या प्रवर्तकांनी स्टँडर्ड चार्टर्ड बँकेकडे तारण ठेवलेल्या कर्जाची पूर्तता केली आहे. वेदांता कंपनीने शेअर बाजार नियामक सेबीला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, कंपनीच्या प्रवर्तकांनी 100 दशलक्ष डॉलर्स कर्ज परतफेड केले आहे. (Vedanta Limited)
‘वेदांता’ कंपनीने या कर्जाची परतफेड 10 मार्च 2023 रोजी पूर्ण केली आहे. ही बातमी आल्यानंतर ‘वेदांता’ कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत मोठी उसळी पाहायला मिळाली. त्यानंतर NSE इंडेक्सवर वेदांता कंपनीचे शेअर्स 1.70 टक्क्यांच्या वाढीसह 284.15 रुपयांवर पोहोचले होते. वेदांता कंपनीचा शेअर मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 280.90 रुपयांवर क्लोज झाले होते. दीर्घ मुदतीत या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस परतावा कमावून दिला आहे. वेदांता कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 440.75 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 206.10 रुपये होती.
मागील एका महिन्यात ‘वेदांता’ कंपनीच्या शेअरची किंमत 9 टक्क्यांनी कमजोर झाली आहे. त्याच वेळी वेदांता कंपनीचे शेअर्स मागील 6 महिन्यांत 10 टक्क्यांनी कमजोर झाले आहेत. तथापि ज्या गुंतवणूकदारांनी 3 वर्षांपूर्वी ‘वेदांता’ कंपनीच्या शेअर्सवर पैसे लावले होते, त्यांना आता 238 टक्क्यांचा बंपर परतावा मिळाला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		