 
						Vedanta Share Price | वेदांता लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मागील 25 वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 13366 टक्केपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही 25 वर्षांपूर्वी वेदांता लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 1 कोटी 34 लाख रुपये झाले असते. ( वेदांता लिमिटेड कंपनी अंश )
वेदांता लिमिटेड कंपनीने जून 2024 तिमाहीत अॅल्युमिनियम, जस्त, लोहखनिज आणि स्टीलच्या उत्पादनात जबरदस्त वाढ साध्य केली आहे. आज शुक्रवार दिनांक 5 जुलै 2024 रोजी वेदांता लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.26 टक्के वाढीसह 475 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
2024 या वर्षात वेदांता लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 80 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षभरात या कंपनीचे शेअर्स 67 टक्क्यांपेक्षा जास्त वाढले आहेत. मागील सहा महिन्यांत वेदांता लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 75 टक्के नफा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 506.75 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 208 रुपये होती.
जून 2024 तिमाहीत वेदांता लिमिटेड कंपनीने ॲल्युमिनिअम उत्पादनात 3 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. या कंपनीने जून तिमाहीत एकूण 5,96,000 टन ॲल्युमिनिअम उत्पादन केले आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये वेदांता लिमिटेड कंपनीचे शेअर्स 468.10 रुपये किमतीवर ओपन झाले होते. तर दिवसभरात हा स्टॉक 470.80 रुपये किमतीवर ओपन झाला होता. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1.69 लाख कोटी रुपये आहे. या स्टॉकचा एक वर्षाचा बीटा 1 आहे. जो या कालावधीतील सरासरी उच्च अस्थिरता दर्शवतो.
झिंक इंडियामध्ये विक्रीयोग्य धातूचे उत्पादन 2,60,000 टनांवरून वाढून 2,62,000 टनवर गेले आहे. तर झिंक इंटरनॅशनलमध्ये धातूचे उत्पादन घसरून 38,000 टन झाले आहे. आर्थिक वर्ष 2024-25 च्या जून तिमाहीत हे प्रमाण 68,000 टन झाले आहे. जून तिमाहीत खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचे उत्पादन 17 टक्क्यांनी घसरले आहे. वेदांता लिमिटेड कंपनीचे विक्रीयोग्य लोह धातूचे उत्पादन मागील वर्षीच्या जून तिमाहीत 1.2 दशलक्ष टन होते, जे जून 2024 तिमाहीत वाढून 1.3 दशलक्ष टन झाले आहे. यासह वेदांता लिमिटेड कंपनीचे विक्रीयोग्य पोलाद उत्पादन 10 टक्क्यांच्या वाढीसह 3,56,000 टन झाले आहे.
देशात विजेची विक्री 13 टक्क्यांच्या वाढीसह 4,791 दशलक्ष युनिट्सवर गेली आहे. मागील आर्थिक वर्षात जून तिमाहीत देशातील वीज विक्री 4,256 दशलक्ष युनिट्स होती. वेदांता लिमिटेड ही कंपनी मुख्यतः भारत, दक्षिण आफ्रिका, नामिबिया, लायबेरिया, संयुक्त अरब अमिराती,. कोरिया, तैवान आणि जपानमध्ये व्यवसाय करणाऱ्या जगातील आघाडीच्या नैसर्गिक संसाधन कंपन्यांपैकी एक आहे. वेदांता लिमिटेड ही कंपनी वेदांता रिसोर्सेस लिमिटेड या कंपनीची उपकंपनी आहे. या कंपनीने तेल आणि वायू, जस्त, शिसे, चांदी, तांबे, लोह धातू, पोलाद, निकेल,. ॲल्युमिनियम आणि उर्जा या क्षेत्रांमध्ये आपली मजबूत उपस्थिती निर्माण केली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		