Vedanta Share Price | मालामाल शेअर! वेदांता कंपनीच्या शेअर गुंतवणूकदारांसाठी खुशखबर,1850 टक्के डिव्हीडंड मिळणार

Vedanta Share Price | भारतातील प्रसिद्ध उद्योगपती ‘अनिल अग्रवाल’ यांच्या मालकीच्या ‘वेदांता’ कंपनीने पुन्हा एका आपल्या गुंतवणूकदारांना लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. ‘वेदांता’ कंपनीने आर्थिक वर्ष 2023-24 साठी पहिला अंतरिम लाभांश जाहीर केला आहे.

1850 टक्के लाभांश जाहीर
सेबीला दिलेल्या माहितीत ‘वेदांता’ कंपनीने कळवले आहे की, 1 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअरवर कंपनी 1850 टक्के म्हणजेच 18.50 रुपये लाभांश जाहीर केला आहे. ‘वेदांता’ कंपनीने लाभांश वाटपासाठी रेकॉर्ड तारीख म्हणून 30 मे 2023 हा दिवस निश्चित केला आहे. आज बुधवार दिनांक 24 मे 2023 रोजी या कंपनीचे (Vedanta Share Price NSE) शेअर्स 0.88 टक्के वाढीसह 290.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Vedanta Share Price BSE)

लाभांश इतिहास
‘वेदांता’ कंपनीने लाभांश वाटपासाठी 30 मे 2023 हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून जाहीर केला आहे. ज्या गुंतवणूकदाराचे नाव रेकॉर्ड तारीख पूर्वज कंपनीच्या रेकॉर्ड बुकमध्ये असे, त्यांना कंपनी लाभांश वाटप करेल. मागील वर्षी ‘वेदांता’ कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 5 वेळा लाभांश वितरीत केला होता. मार्च तिमाहीत ‘वेदांता’ कंपनीने शेअर धारकांना प्रति शेअर 20.50 रुपये लाभांश दिला होता. यासाठी रेकॉर्ड डेट म्हणून कंपनीने 7 एप्रिल 2023 हा दिवस निश्चित केला होता. मागील आर्थिक वर्षात ‘वेदांता’ कंपनीने आपल्या पात्र गुंतवणूकदारांना एकूण 101.50 रुपये लाभांश वाटप केला होता.

कंपनीची तिमाही कामगिरी
एप्रिल 2023 मध्ये ‘वेदांता’ कंपनीने मार्च 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले होते. त्यानंतर ‘वेदांता’ कंपनीने दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या निव्वळ नफ्यात वार्षिक 56.3 टक्के घट नोंदवली गेली आहे. मार्च 2023 तिमाहीत ‘वेदांता’ कंपनीने 2634 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. मागील वर्षी याच तिमाहीत ‘वेदांता’ कंपनीने 6020 रुपये निव्वळ नफा कमावला होता. मागील तिमाहीत वेदांता कंपनीच्या महसुलातही घसरण पाहायला मिळाली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Vedanta Share Price today on 24 May 2023.