20 May 2024 11:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना मजबूत व्याज देणाऱ्या 5 बँकांच्या FD योजना, मिळेल 9.60% पर्यंत व्याज IRFC Share Price | IRFC स्टॉकच्या टेक्निकल चार्टवर राऊंडिंग बॉटम पॅटर्न, शेअर्स BUY करावे की Sell? Mutual Fund SIP | केवळ 5,400 रुपयांची SIP बचत करोडमध्ये परतावा देईल, अशी करा गुंतवणूक SBI FD Interest Rates | SBI ग्राहकांनो! FD व्याजाचे नवे दर समजून घ्या, अन्यथा नुकसान, सर्व ग्राहकांना लाभ नाही Numerology Horoscope | 20 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 20 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या OPPO A59 5G | फक्त 12600 रुपयांत सर्वात स्वस्त 5G OPPO फोन, 128GB स्टोरेज आणि बरंच काही
x

Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवरचा 12 रुपयाचा मल्टिबॅगर शेअर तुफान तेजीत, प्रतिदिन 10 टक्क्याने वाढतोय, खरेदी करावा?

Highlights:

  • रिलायन्स पॉवर शेअरची किंमत
  • रिलायन्स पॉवर स्टॉक तेजीचे कारण
  • विदर्भ इंडस्ट्रीज पॉवर लिमिटेड कंपनी
  • 585 टक्के परतावा कमावून दिला
Reliance Power Share Price

Reliance Power Share Price | अनिल अंबानींच्या ‘रिलायन्स पॉवर’ कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 10 टक्के वाढीसह 12.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ‘रिलायन्स पॉवर’ कंपनीचे एकूण बाजार भांडवल 4700 कोटी रुपये आहे.

रिलायन्स पॉवर शेअरची किंमत
28 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.05 रुपये या आपल्या नीचांक किमतीवर ट्रेड करत होते. तर 6 सप्टेंबर 2022 रोजी ‘रिलायन्स पॉवर’ कंपनीचे शेअर्स 24.95 रुपये या आपल्या उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. आज बुधवार दिनांक 24 मे 2023 रोजी ‘रिलायन्स पॉवर’ कंपनीचे (Reliance Power Share Price NSE) शेअर्स 6.95 टक्के घसरणीसह 12.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Reliance Power Share Price BSE)

रिलायन्स पॉवर स्टॉक तेजीचे कारण :
रिलायन्स पॉवर कंपनीने आपली उपकंपनी ‘विदर्भ इंडस्ट्रीज पॉवर लिमिटेड’ वरील कर्ज फेडण्यासाठी कर्जदारांसमोर एक नवीन प्रस्ताव सादर केला आहे. या अंतर्गत ‘रिलायन्स पॉवर’ ने 1200 कोटी रुपयेची वन टाइम सेटलमेंट ऑफर दिली आहे. या ऑफरनुसार ‘रिलायन्स पॉवर’ कंपनी कर्जदारांना अंदाजे 1,200 कोटी रुपये रोख देण्यास तयार आहे.

विदर्भ इंडस्ट्रीज पॉवर लिमिटेड कंपनी
‘विदर्भ इंडस्ट्रीज पॉवर लिमिटेड’ कंपनीला कर्ज देणाऱ्यांमध्ये अॅक्सिस बैंक, एसबीआय, बँक ऑफ बडोदा, पीएनबी, कॅनरा बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, यासारखे दिग्गज बँक सामील आहेत. 31 मार्च 2022 पर्यंत ‘विदर्भ इंडस्ट्रीज पॉवर लिमिटेड’ कंपनीवर 2,200 कोटी रुपये कर्ज होते.

रिलायन्स पॉवर कंपनीच्या ओटीएस ऑफरला सिंगापूर स्थित वर्डे पार्टनर्सने मान्य केला आहे. VIPL महाराष्ट्रातील नागपूर येथील बुटीबोरी औद्योगिक परिसरात 600 मेगावॅट क्षमतेचा कोळसा आधारित वीज निर्मिती प्रकल्प चालवत आहे.

585 टक्के परतावा कमावून दिला
2008 साली रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स 275 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. त्यांनतर स्टॉकमध्ये 98 टक्के घसरण झाली. मागील एका वर्षात ‘रिलायन्स पॉवर’ कंपनीच्या शेअरची गरी मंदावली आहे. मागील दोन वर्ष आणि तीन वर्षांच्या कालावधीत या कंपनीच्या शेअरने लोकांना अनुक्रमे 75 टक्के आणि 585 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Reliance Power Share Price today on 24 May 2023.

FAQ's

How to Buy Reliance Power Share?

आपण रिलायन्स पावर शेअर्स Zerodha Kite, Angel One App, Upstox Pro, 5paisa, ICICI Direct App and Groww वर डीमॅट खाते तयार करून आणि केवायसी कागदपत्रांची ऑनलाइन पडताळणी करून खरेदी करू शकता.

What is the Share Price of Reliance Power?

कोणत्याही शेअरच्या शेअरची किंमत अस्थिर असते आणि वेगवेगळ्या घटकांमुळे दिवसभर बदलत राहते. २४ मे २०२३ रोजी रिलायन्स पॉवरच्या शेअरची किंमत रु.१२.०५ आहे.

What is the Market Cap of Reliance Power?

मार्केट कॅपिटलायझेशन, मार्केट कॅपसाठी कमी, सार्वजनिकरित्या व्यवहार केलेल्या कंपनीच्या थकित शेअर्सचे बाजार मूल्य आहे. 24 मे 2023 पर्यंत रिलायन्स पॉवरचे मार्केट कॅप 4,837 कोटी रुपये आहे.

What is the PE and PB ratio of Reliance Power?

24 मे 2023 पर्यंत रिलायन्स पॉवरचे पीई आणि पीबी गुणोत्तर 135.8532 आणि 0.41716 आहे.

What is the 52 Week High and Low of Reliance Power?

52 आठवड्यांचा उच्चांक/नीचांकी दर हा त्या दिलेल्या कालावधीत (1 वर्षासारखा) रिलायन्स पॉवरच्या शेअरने व्यवहार केलेला सर्वोच्च आणि सर्वात कमी दर आहे आणि तो तांत्रिक सूचक मानला जातो. 24 मे 2023 रोजी रिलायन्स पॉवरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी आणि नीचांकी 25.00 रुपये आणि 9.05 रुपये आहे.

हॅशटॅग्स

Reliance Power Share Price(53)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x