 
						Vesuvius India Share Price | व्हेसुवियस इंडिया लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 20 टक्के वाढीसह तेजीत धावत होता. या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना आश्चर्यकारक नफा कमावून दिला आहे. मागील सहा महिन्यांत कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे. (Vesuvius Share Price)
सहा महिन्यांपूर्वी व्हेसुवियस इंडिया लिमिटेडकंपनीचे शेअर्स 1605.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज हा स्टॉक 3300 रुपयेपेक्षा जास्त वाढला आहे. या काळात कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 110.84 टक्के नफा कमावून दिला आहे. आज शुक्रवार दिनांक 28 जुलै 2023 रोजी व्हेसुवियस इंडिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स 4.26 टक्के वाढीसह 3,351.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
व्हेसुवियस इंडिया लिमिटेड कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 3,520.00 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 1,122.75 रुपये होती. 14 जुलै 1995 रोजी व्हेसुवियस इंडिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स 59.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ज्या गुंतवणूकदाराने 1995 साली या कंपनीच्या शेअरमध्ये पैसे लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 5309 टक्क्यांनी वाढले आहे.
मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 188.25 टक्के परतावा कमावून दिला आहे. समभागाने 185 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे . मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने लोकांना 46.67 टक्के परतावा कमावून दिला आहे.
30 जून 2023 रोजी संपलेल्या तिमाहीत व्हेसुवियस इंडिया लिमिटेड कंपनीच्या प्रवर्तकांकडे 55.57 टक्के भाग भांडवल होते. मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत परकीय गुंतवणूकदारांच्या शेअरचे प्रमाण 0.84 टक्क्यांवरून कमी होऊन 0.77 टक्क्यांवर आले आहे. देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांमध्ये म्युच्युअल फंडांने या कंपनीचे सर्वात जास्त शेअर्स धारण केले आहेत. MF नी व्हेसुवियस इंडिया लिमिटेड कंपनीचे 23.10 टक्के भाग भाद्वाल धारण केले आहेत. तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी कंपनीचे एकूण 23.20 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		