 
						Vikas Lifecare Share Price | विकास लाइफकेअर कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त चढ उतार पाहायला मिळत आहेत. गुरुवारी हा स्टॉक 10 टक्के वाढीसह ट्रेड करत होता. कंपनीला नवीन ऑर्डर मिळाल्यामुळे गुंतवणूकदारांनी शेअर खरेदीला सुरुवात केली आणि स्टॉक तेजीत आला. विकास लाइफकेअर कंपनीच्या कृषी उत्पादन विभागाला 15.5 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर प्राप्त झाली आहे. आर्थिक वर्ष 2023-23 च्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीला ऑर्डरची पूर्तता करायची आहे.
शेअर्सची 52 आठवड्यांची पातळी
विकास लाइफकेअर कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 3.04 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 6.84 रुपये होती. तर नीचांकी पातळी किंमत 2.66 रुपये होती. आज शुक्रवार दिनांक 26 मे 2023 रोजी विकास लाइफकेअर कंपनीचे शेअर्स 1.64 टक्के घसरणीसह 3.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (BSE Share Price)
नवीन ऑर्डर
विकास लाइफकेअर कंपनीच्या अॅग्रो प्रॉडक्ट्स डिव्हिजनने नवीन ऑर्डर मिळण्यापूर्वी 48 कोटी रुपये मूल्याची विक्री केली होती. कंपनीने चालू आर्थिक वर्षात कृषी उत्पादने विभागासाठी 300 कोटी रुपयेचे व्यापारी उद्दिष्ट निश्चित केले होते. मागील आर्थिक वर्षात या कंपनीने 200 कोटी रुपये मूल्याची एकूण सेल्स नोंदवली होती. विकास लाइफकेअर कंपनीचे एकूण बाजार भांडवल 437 कोटी रुपये आहे. कंपनीने कृषी उत्पादनांच्या व्यवसायात वाढ करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.
विकास लाइफकेअर कंपनी तिमाही निकाल
विकास लाइफकेअर कंपनी आपला कृषी उत्पादन व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. कंपनीने निर्यात व्यापार वृध्दीवर देखील लक्ष केंद्रित केले आहे. 31 मार्च 2023 रोजी संपलेल्या तिमाहीत विकास लाइफकेअर कंपनीने 116.45 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.
या तिमाहीत कंपनीला 25.97 कोटी रुपये निव्वळ तोटा सहन करावा लागला होता. संपूर्ण आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये कंपनीने 462.72 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. त्याचवेळी कंपनीला 15.36 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		