
Vinsys IT Services IPO | सध्या शेअर बाजारात अनेक छोट्या मोठ्या कंपन्यां आपले आयपीओ लाँच करून भरघोस भांडवल उभारणी करत आहे. या स्मॉल कंपन्या आपल्या IPO च्या माध्यमातून गुंतवणुकदारांना आकर्षित करतात आणि त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात भांडवल जमा करतात. यातूनच त्याच्या व्यापाराला हातभार मिळतो. अनेक कंपन्यांच्या IPO ने आपल्या गुंतवणुकदारांना श्रीमंत केले आहे. (Vinsys IT Services Share Price)
अशीच एक कंपनी म्हणजेच विन्सिस आयटी सर्व्हिसेस. या कंपनीचे शेअर्स 62 टक्के प्रिमियम किमतीवर सूचीबद्ध झाले होते. शुक्रवार दिनांक 11 ऑगस्ट 2023 रोजी विन्सिस आयटी सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स 70 टक्के प्रीमियम वाढीसह 217.60 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते.
विन्सिस आयटी सर्व्हिसेस कंपनीच्या IPO मध्ये पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 36.95 पट अधिक सबस्क्राईब झाला आहे. तर गैरसंस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 105.75 पट अधिक खरेदी केला गेला होता. किरकोळ गुंतवणूकदाराना IPO मध्ये फक्त एक लॉट खरेदी करण्याची परवानगी होती. विन्सिस आयटी सर्व्हिसेस कंपनीने आपल्या IPO मध्ये एका लॉटमध्ये 1000 शेअर्स जारी केले होते. तर शेअरची किंमत बँड 121-128 रुपये निश्चित करण्यात आली होती.
विन्सिस आयटी सर्व्हिसेस या कंपनीने आपले शेअर्स 128 रुपये या अप्पर किंमत बँडवर शेअर धारकांना वाटप केले होते. विन्सिस आयटी सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स 207.25 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते. म्हणजेच स्टॉक लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांना 79.25 रुपये प्रति शेअर म्हणजेच 62 टक्के नफा मिळाला आहे. या कंपनीचा IPO एकूण 89 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. हा IPO स्टॉक 1 ऑगस्ट ते 4 ऑगस्ट 2023 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. या कंपनीच्या आयपीओमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 111.56 पट अधिक सबस्क्राइब झाला होता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.