27 July 2024 11:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | सरकारी योजनेत फायदाच फायदा! 95 रुपयांच्या बचतीवर मिळतील 14 लाख रुपये, संधी सोडू नका Reliance Power Share Price | कर्जमुक्त कंपनी रिलायन्स पॉवरचा शेअर 'पॉवर' दाखवणार, 29 रुपयांचा शेअर खरेदीला गर्दी Smart Investment | पैशाने पैसा बनवतो हा फॉर्म्युला, वयाच्या 40 आधीच स्वतःचा आलिशान फ्लॅट खरेदी करू शकाल OTT Most Watch Film | OTT वर सर्वाधिक पाहिले जात आहेत हे हिंदी चित्रपट, थ्रिलर सिनेमा टॉप ट्रेंडमध्ये Upcoming Movies | 15 ऑगस्टला बॉक्स ऑफिस धमाका; या चार सिनेमांची चित्रपटगृहात होणारं थेट भेट Bonus Share News | कमाईची संधी सोडू नका! ही कंपनी फ्री शेअर्स देणार, शॉर्ट टर्म मध्ये पैसा वाढवा HFCL Share Price | 5G संबंधित HFCL सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा
x

Vivanza Biosciences Share Price | या पेनी शेअरने 1500 टक्के परतावा दिला, आता स्टॉक स्प्लिट होणार, गुंतवणूकदार मालामाल झाले

Vivanza Biosciences Share Price

Vivanza Biosciences Share Price | मागील एक महिन्यापासून ‘विवान्झा बायोसायन्सेस’ कंपनीचे शेअर्स सतत अप्पर सर्किट हीट करत आहेत. बुधवार दिनांक 15 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.98 वाढीसह 207.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअर्सनी आपल्या शेअर धारकांना कोविड नंतरच्या रॅलीमध्ये 1500 टक्के परतावा कमावून दिला होता. ‘विवान्झा बायोसायन्सेस’ कंपनीचे शेअर्स मागील तीन वर्षांत 12.45 रुपयेवरून वाढून 207.80 रुपये किमतीवर पोहचले आहेत. या पेनी स्टॉक कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. (Vivanza Biosciences Ltd)

स्टॉकमध्ये जबरदस्त तेजी :
या मल्टीबॅगर पेनी स्टॉकमधील तेजी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. मागील सहा ट्रेडिंग सेशनपासून ‘विवान्झा बायोसायन्सेस’ कंपनीचे शेअर्स दररोज 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटवर हीट करत आहेत. 6 मार्च 2023 पासून हा स्टॉक 5 टक्के अप्पर सर्किटमध्ये अडकला आहे. मागील पाच दिवसात या कंपनीच्या शेअर ने आपल्या गुंतवणुकदारांना 21.48 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील एका महिन्यात या कंपनीचे शेअर्स 44.81 टक्के वाढले आहेत. मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअर ने लोकांना 31.52 टक्के परतावा कमावून दिला आहे.

स्टॉकमधील वाढीचे कारण :
‘विवान्झा बायोसायन्सेस’ या कंपनीने नुकताच पार पडलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत स्टॉक स्प्लिट करण्याची घोषणा केली होती. कंपनीने 1:10 या प्रमाणात स्टॉक विभाजन करण्याची घोषणा केली आहे. यासाठी कंपनीने रेकॉर्ड डेट म्हणून 24 मार्च 2023 हा दिवस निश्चित केला आहे. या कंपनीच्या शेअरची वाढ YTD आधारे 26.86 टक्के आहे. तर सुरूवातीपासून आतपर्यंत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 76.98 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Vivanza Biosciences Share Price 530057 return on investment check details on 15 March 2023.

हॅशटॅग्स

Vivanza Biosciences Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x