Vodafone Idea Share Price | वोडाफोन आयडिया शेअर 8 रुपयांच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला नोट करा - NSE: IDEA

Vodafone Idea Share Price | सोमवारी व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी शेअर 6.75 टक्क्यांनी घसरून 7.88 रुपयांवर (NSE: IDEA) पोहोचला होता. अखेर व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी शेअर ८ रुपयांच्या खाली घसरला आहे. मागील १ महिन्यात हा शेअर १९.४९% घसरला आहे. तसेच २०२४ मध्ये आतापर्यंत व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी शेअर ५३.५६% घसरला आहे. (व्होडाफोन आयडिया कंपनी अंश)
कंपनीचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल
व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीने दुसऱ्या तिमाहीचे निकाल 13 नोव्हेंबरला जाहीर करणार आहे. व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीने स्टॉक मार्केटला दिलेल्या माहितीप्रमाणे, ‘कंपनी संचालक मंडळाची बैठक बुधवारी, १३ नोव्हेंबर २०२४ रोजी होणार आहे. या बैठकीत दुसरी तिमाही आणि सहामाही वर्षाच्या लेखापरीक्षण न केलेल्या आर्थिक निकालांवर विचार करून त्याला मंजुरी देण्यात येणार आहे अशी माहिती दिली आहे.
ऑक्टोबर मध्ये व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीने स्टॉक एक्स्चेंजला कळवले होते की कंपनीने केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाला सविस्तर निवेदन दिले आहे. या निवेदनात 2022 पूर्वी खरेदी केलेल्या स्पेक्ट्रमसाठी बँक गॅरंटीची आवश्यकता काढून टाकण्यासाठी केंद्र सरकारच्या दूरसंचार नियामकाशी चर्चा सुरू केली आहे. केंद्र सरकारकडून अंतिम निर्णय झाल्यानंतर व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी आवश्यक खुलासा करेल, असेही या पत्रकात म्हटले आहे.
रेलिगेअर ब्रोकरेज फर्म
रेलिगेअर ब्रोकरेज फर्मने व्होडाफोन आयडिया शेअर प्राईसच्या सध्याच्या पातळीवर ‘बॉटम-फिशिंग’ न करण्याचा सल्ला दिला आहे. रेलिगेअर ब्रोकरेज फर्मचे तज्ज्ञ म्हणाले की, ‘व्होडाफोन आयडिया शेअर दैनंदिन चार्टवर सकारात्मक संकेत दिसत नाहीत. पुढे हा शेअर ७ रुपयांपर्यंत घसरू शकतो असं संकेत रेलिगेअर ब्रोकरेज फर्मने दिले आहेत.
एंजल वन ब्रोकरेज फर्म
एंजल वनचे तज्ज्ञ म्हणाले की, “व्होडाफोन आयडिया शेअर सुधारणेच्या टप्प्यात आहे. काही आठवड्यांपासून काऊंटर ओव्हरसोल्ड स्थितीत आहे आणि पुढे सकारात्मक संकेत दिसत नाहीत. त्यामुळे तज्ज्ञांनी सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Vodafone Idea Share Price 04 November 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER