
Vodafone Idea Share Price | गुरुवारी व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी शेअर 0.14 टक्के घसरून 7.35 रुपयांवर (NSE: IDEA) पोहोचला आहे. गुरुवारी एनएसईवर ८५ लाखांहून अधिक शेअर्सचे ट्रेड झाले. मागील १ महिन्यात हा शेअर 19.41% घसरला आहे. (व्होडाफोन आयडिया कंपनी अंश)
दुसऱ्या तिमाहीचे निकाल
व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीने दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केल्यानंतर गुरुवारी सकाळी शेअर तेजीत होता. दुसऱ्या तिमाहीत व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीचा एकत्रित तोटा 7,175.9 कोटी रुपयांवर आला आहे, जो गेल्या वर्षी याच तिमाहीत 8,746.6 कोटी रुपये होता.
कंपनी महसूलात वाढ
व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीचा सेवांमधून एकत्रित महसूल 1.8 टक्क्यांनी वाढून 10,918.1 रुपये झाला आहे, जो मागील वर्षी याच कालावधीत 10,714.6 कोटी रुपये होता. दुसऱ्या तिमाहीत व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीचे कामकाजातून एकत्रित उत्पन्न वाढून 10,932.2 कोटी रुपये झाले आहे, जे गेल्या वर्षी 10,716.3 कोटी रुपये होते.
नोमुरा इंडिया ब्रोकरेज फर्म – ‘BUY’ रेटिंग
नोमुरा इंडिया ब्रोकरेज फर्मने व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. नोमुरा इंडिया ब्रोकरेज फर्मने व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी शेअरला १४ रुपये टार्गेट प्राईस दिली आहे.
नोमुरा इंडिया ब्रोकरेज फर्मने व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी उत्पन्नाचा अंदाज कमी केल्याने आणि डिसेंबर २०२६ च्या कमाईच्या अंदाजात कपात केल्यामुळे नोमुरा इंडिया ब्रोकरेज फर्मने यापूर्वी सुचविलेल्या १५ रुपयांच्या टार्गेट किमतीपेक्षा कमी टार्गेट प्राईस दिली आहे.
मल्टिबॅगर परतावा
मागील ६ महिन्यात व्होडाफोन आयडिया शेअर 44.32% घसरला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 47.69% परतावा दिला. मागील ५ वर्षात व्होडाफोन आयडिया शेअरने 101.37% परतावा दिला आहे. मात्र YTD आधारवर व्होडाफोन आयडिया शेअर 56.76% घसरला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.