
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. नुकताच या कंपनीच्या संचालक मंडळाने 2075 रुपये मूल्याचे प्रेफरन्स शेअर्स जारी करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. व्होडाफोन आयडिया कंपनीने 6 एप्रिल रोजी आदित्य बिर्ला समूहाकडून 2,075 कोटी रुपये भांडवल उभारणी करण्यचा प्रस्ताव मंजूर केला आहे. ( व्होडाफोन आयडिया कंपनी अंश )
व्होडाफोन आयडिया कंपनीने आदित्य बिर्ला ग्रुपच्या ओरियाना इन्व्हेस्टमेंट्स PTE या उपकंपनीला 1,39.5 कोटी इक्विटी शेअर्स 14.87 रुपये किमतीवर इश्यू करण्यात आले आहेत. आज सोमवार दिनांक 8 एप्रिल 2024 रोजी व्होडाफोन आयडिया स्टॉक 2.26 टक्के घसरणीसह 13 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
व्होडाफोन आयडिया या दूरसंचार कंपनीने शेअर्सची फ्लोअर प्राइस निश्चित करण्यासाठी 8 एप्रिल 2024 हा दिवस निश्चित केला आहे. व्होडाफोन आयडिया कंपनीच्या संचालक मंडळाने कंपनीचे अधिकृत भाग भांडवल 75,000 कोटी रुपयेवरून वाढवून 1 लाख कोटी रुपये करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. सध्या या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 75000 कोटी रुपये आहे. यामध्ये 70,000 कोटी रुपये मूल्याचे इक्विटी शेअर आणि 5,000 कोटी रुपये मूल्याचे प्रेफरन्स शेअर्स आहेत.
व्होडाफोन आयडिया या दूरसंचार कंपनीने माहिती दिली की, प्रस्तावित 100000 कोटी रुपये या भाग भांडवलात 95,000 कोटी रुपये मूल्याचे इक्विटी शेअर असतील आणि 5,000 कोटी रुपये मूल्याचे प्रेफरन्स शेअर्स असतील. कंपनीने 8 मे रोजी सर्वसाधारण सभेचे आयोजन केले आहे. यामध्ये सर्व प्रस्ताव शेअरधारकांच्या मंजुरीसाठी मांडले जातील. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 0.30 टक्क्यांच्या घसरणीसह 13.32 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.