
Vodafone Idea Share Price | बँक ऑफ अमेरिका सिक्युरिटीज फर्मने व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीची रेटिंग ‘अंडरपरफॉर्म’ वरून अपग्रेड करून ‘न्यूट्रल’ केली आहे. ब्रोकरेज फर्मचे म्हणणे आहे की, व्होडाफोन आयडिया कंपनीला निधी उभारण्यात यश मिळाल्यामुळे कंपनीच्या 4G-5G नेटवर्क पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ( व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी अंश )
ब्रोकरेज फर्मने व्होडाफोन आयडिया स्टॉकची टारगेट प्राइस 14.5 रुपये निश्चित केली आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये व्होडाफोन आयडिया स्टॉक 0.15 टक्क्यांच्या वाढीसह 13.22 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. आज शुक्रवार दिनांक 3 मे 2024 रोजी व्होडाफोन आयडिया स्टॉक 0.76 टक्के वाढीसह 13.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
BofA ने दूरसंचार क्षेत्रातील वाढीबाबत सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. ब्रोकरेज फर्मने पूर्वी टेलिकॉम कंपन्या 10-15 टक्के टॅरिफ वाढ करणार असा अंदाज व्यक्त केला होता, मात्र आता ही टॅरिफ वाढ प्रत्यक्षात 20-25 टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. ब्रोकरेज फर्मचा विश्वास आहे की, या दर वाढीमुळे टेलिकॉम कंपन्याच्या रोख प्रवाहात सुधारणा होऊ शकते. आणि हा रोख प्रवाह हाय मार्जिन फायबर ब्रॉडबँड सेवांचा विस्तार करण्यासाठी वापरला जाऊ शकतो.
BofA च्या मते, लोकसभा निवडणुकांनंतर टेलिकॉम शुल्कात मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते. जर ग्राहकांनी ही दरवाढ स्वीकारली तर, पुढील 12 महिन्यांत टेलिकॉम कंपन्या आणखी एकदा दर वाढ करू शकतात. कारण अनेक टेलिकॉम कंपन्या 5G गुंतवणुकीतून अधिक कमाई करण्याचा विचार करत आहेत. BofA च्या मते, या दरवाढींचा फायदा घेण्यासाठी भारती एअरटेल कंपनीसाठी सकारात्मक स्थिती आहे. तर ब्रोकरेज फर्मसाठी इंडस टॉवर्स ही कंपनी दूरसंचार क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी आवडती कंपनी आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.