
Vodafone Idea Share Price | भारत सरकारमधील अर्थमंत्री निर्मला सीतारामन 23 जुलै 2024 रोजी देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पाकडून देशातील नागरिकांना तसेच गुंतवणुकदारांना खूप अपेक्षा आहेत. याच पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. शेअर बाजारातील अनेक तज्ञांनी व्होडाफोन आयडिया स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ( व्होडाफोन आयडिया कंपनी अंश )
तज्ञांनी व्होडाफोन आयडिया स्टॉक 21-22 रुपये या अल्पकालीन टार्गेट प्राइससाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते हा स्टॉक पुढील 12-18 महिन्यात 25-26 रुपये किमतीवर जाऊ शकतो. शुक्रवार दिनांक 12 जुलै 2024 रोजी व्होडाफोन आयडिया स्टॉक 2.72 टक्के घसरणीसह 16.11 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.
मागील महिन्यात व्होडाफोन आयडिया कंपनीने FPO च्या माध्यमातून 20,000 कोटी रुपये भांडवल उभारणी केली होती. तसेच टेलिकॉम कंपन्यांनी दरवाढ केल्यामुळे व्होडाफोन कंपनीला देखील एक बूस्टर डोस मिळाला आहे. यामुळे दूरसंचार कंपनीच्या महसूल संकलनात वार्षिक आधारावर 47500 कोटी रुपये अतिरिक्त वाढ होण्याची अपेक्षा आहे. रिलायन्स जिओ कंपनीचा आयपीओ पुढील वर्षी शेअर बाजारात लाँच होऊ शकतो, अशी बातमी प्रसिद्ध झाली आहे. याचा परिमाण देखील भारतीय टेलिकॉम सेक्टरवर पाहायला मिळू शकतो.
शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, व्होडाफोन आयडिया कंपनीला एजीआर थकबाकीबाबत दिलासा मिळण्याची शक्यता आहे. व्होडाफोन आयडिया कंपनीने दूरसंचार विभागाला 25,000 कोटी रुपयेची बँक हमी माफ करण्याची विनंती केली होती. तसेच कंपनीच्या कर्जदात्यानी देखील आपले कर्ज इक्विटीमध्ये रूपांतर करण्याची मागणी केली आहे. तज्ञांच्या मते, पुढील 12 महिन्यांत व्होडाफोन आयडिया स्टॉक 21-22 रुपये आणि 18 महिन्यांमध्ये 25-26 रुपये टार्गेट प्राइस स्पर्श करू शकतो.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.