2 May 2024 1:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | एका वडापावच्या किमतीत 8 शेअर्स खरेदी करू शकता, मालामाल करणाऱ्या 10 पेनी शेअर्सची यादी Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड आणि टाटा मोटर्ससहित हे टॉप 5 शेअर्स तगडा परतावा देणार, खरेदीला ऑनलाईन गर्दी Adani Gas Share Price | अदानी टोटल गॅस शेअर्सवर 'बाय' रेटिंग, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर Reliance Home Finance Share Price | शेअर प्राईस 4 रुपये, हा स्वस्त स्टॉक पुन्हा चर्चेत आला, शेअर्स खरेदी वाढणार? ICICI Mutual Fund | लहान मुलांसाठी वरदान आहे ही म्युच्युअल फंड योजना, 10,000 रुपयांच्या SIP वर 1.90 कोटी परतावा Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

Astral Share Price | लॉटरी शेअर! गुंतवणुकीवर 103000 टक्के परतावा, प्लस फ्री बोनस शेअर्स, रेकॉर्ड डेट पहा

Astral Share Price

Astral Share Price | ‘एस्ट्रल लिमिटेड’ या औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना मोठी भेट देण्याची घोषणा केली आहे. या मल्टीबॅगर कंपनीने आपल्या विद्यमान पात्र शेअर धारकांना 1 : 3 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. म्हणजेच Astral कंपनी आपल्या प्रत्येक 3 शेअर्सवर 1 बोनस शेअर मोफत वाटप करणार आहे. एस्ट्रल कंपनीने स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये माहिती दिली आहे की, कंपनीच्या संचालक मंडळाने 1 : 3 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. या कंपनीने मंगळवार दिनांक 14 मार्च 2023 हा दिवस बोनस शेअर्सची रेकॉर्ड तारीख म्हणून निश्चित केला आहे. 6 एप्रिल 2023 पर्यंत किंवा 2 महिन्यांच्या आत कंपनी गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स वाटप करेल. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Astral Share Price | Astral Stock Price | BSE 532830 | NSE ASTRAL)

गुंतवणुकीवर 103000 टक्के परतावा :
एस्ट्रल लिमिटेड कंपनीच्या शेअर्सनी मागील काही वर्षात आपल्या शेअर धारकांना जबरदस्त परतावा कमवून दिला आहे. 13 मार्च 2009 रोजी BSE निर्देशांकावर एस्ट्रल लिमिटेड कंपनीचे शेअर्स 2.01 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 9 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स BSE इंडेक्सवर 0.20 टक्के घसरणीसह 2,030.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. या कालावधीत कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 103000 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही 13 मार्च 2009 रोजी एस्ट्रल कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते, ते आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 10.32 कोटी रुपये झाले असते.

एस्ट्रल लिमिटेडचा तिमाही निकाल :
एस्ट्रल लिमिटेड कंपनीने डिसेंबर 2022 च्या तिमाहीत 1267.8 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीत Astral कंपनीने 1102.7 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. या तिमाहीतील महसुलात मागील वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत 15 टक्के ची वाढ नोंदवली गेली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीत एस्ट्रल लिमिटेड कंपनीचा EBITDA 184.4 कोटी रुपये झाला आहे. एस्ट्रल लिमिटेड कंपनीचा ऑक्टोबर-डिसेंबर 2022 या तिमाहीत PBT म्हणजे करपूर्व नफा 129.5 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. तर Astral कंपनीचा आर्थिक वर्ष 2023 च्या तिसऱ्या तिमाहीत PAT 94.9 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. मागील वर्षी याच कालावधीत कंपनीचा PAT 127.9 कोटी रुपये होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Astral Share Price 532830 stock market live on 09 February 2023.

हॅशटॅग्स

#Astral Share Price(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x