
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी निर्माण झाली आहे. अनेक आव्हानांना तोंड देणारी व्होडाफोन आयडिया कंपनी विविध मार्गांनी भांडवल उभारणी करण्याचा प्रयत्न करत आहे. मागील महिन्यात या कंपनीने FPO द्वारे भांडवल उभारणी केली होती. आता कंपनीच्या संचालक मंडळाने ओरियाना इन्व्हेस्टमेंट्स कंपनीच्या प्रवर्तकाना प्रेफरंस शेअर्स वाटप करण्यास मंजुरी दिली आहे. ( व्होडाफोन आयडिया कंपनी अंश )
या मार्गाने कंपनी 2,075 कोटी रुपये निधी जमा करण्याचा प्रयत्न करत आहे. आज गुरूवार दिनांक 23 मे 2024 रोजी व्होडाफोन आयडिया स्टॉक 2.96 टक्के वाढीसह 13.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
स्टॉक मार्केट नियामक सेबी फाइलिंगनुसार, व्होडाफोन आयडिया कंपनीने ओरियाना इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला 139.54 कोटी शेअर्स वाटप करण्यास मंजुरी दिली आहे. या शेअरचे दर्शनी मूल्य 10 रुपये असेल. आणि त्याची इश्यू किंमत 14.87 रुपये असेल. यामध्ये 4.87 रुपये प्रति शेअर प्रीमियम देखील सामील आहे. या शेअर्सचे प्राधान्य आधारावर मूल्य 2,075 कोटी रुपये आहे. या शेअर्सच्या वाटपानंतर व्होडाफोन आयडिया कंपनीचे पेड-अप इक्विटी शेअर कॅपिटल 66,483.45 कोटी रुपयेवरून वाढून 67,878.88 कोटी रुपये झाले आहे.
22 एप्रिल 2024 रोजी व्होडाफोन आयडिया कंपनीने फॉलो-ऑन पब्लिक ऑफरद्वारे 18,000 कोटी रुपये भांडवल उभारणी केली होती. हा FPO व्होडाफोन आयडिया कंपनीसाठी कर्ज आणि इक्विटीद्वारे 45,000 कोटी निधी जमा करण्याच्या योजनेचा एक भाग होता. मागील आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत व्होडाफोन आयडिया कंपनीने 7,674 कोटी रुपये तोटा नोंदवला होता. त्यापूर्वी या कंपनीचा तोटा 6,418.9 कोटी रुपये नोंदवला गेला होता.
मार्च 2024 तिमाहीत व्होडाफोन आयडिया कंपनीचा महसूल 10,531 कोटींवरून वाढून 10,606 कोटी रुपये झाला आहे. या कंपनीचा प्रति वापरकर्ता सरासरी महसूल 145 रुपयेवरून वाढून 146 रुपये झाला आहे. ब्रोकरेज फर्म नोमुराने नुकताच व्होडाफोन आयडिया स्टॉकची रेटिंग अपग्रेड केली आहे. ब्रोकरेज फर्मने या शेअर्सवर प्रति शेअर 15 रुपये टार्गेट प्राइस जाहीर करून स्टॉक रेटिंग ‘न्यूट्रल’ केली आहे. मागील एका वर्षात व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 94 टक्के परतावा कमावून दिला आहे. 21 मे रोजी या कंपनीचे शेअर 2.26 टक्के वाढीसह 13.60 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.