16 June 2024 1:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Credit Card Limit | क्रेडिट कार्ड वापरताना करू नका या 5 चुका, अचानक क्रेडिट कार्ड लिमिट कमी होईल Property Knowledge | भावांनो! तुमची बहीण विवाहित असो वा अविवाहित, वडिलोपार्जित मालमत्तेत असतो 'इतका' हक्क HAL Share Price | HAL स्टॉक चार्टवर मजबूत तेजीचे संकेत, कमाईची मोठी संधी सोडू नका Adani Port Share Price | मल्टिबॅगर अदानी पोर्ट्स शेअरची रेटिंग अपग्रेड, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार BCL Industries Share Price | शेअर प्राईस ₹57, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, शॉर्ट टर्ममध्ये ₹95 वर पोहोचणार SBI Mutual Fund | SBI योजनेत महीना रु.5000 बचत, मुलांच्या शिक्षण ते लग्नकार्यावेळी 55 लाख रुपये मिळतील My EPF Money | पगारदारांनो! सॅलरीतून EPF कापला जातो? पहिलं स्कीम सर्टिफिकेट मिळवा, अन्यथा पेन्शन विसरा
x

ONGC Share Price | हा PSU स्टॉक खीसे भरणार, तज्ज्ञांकडून 'बाय' रेटिंग, भरघोस कमाई करण्याची संधी

ONGC Share Price

ONGC Share Price | ओएनजीसी या सरकारी कंपनीचे शेअर्स मागील काही काळापासून तेजीत वाढत आहेत. नुकताच या कंपनीने आपले मार्च 2024 तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. त्यामुळे ब्रोकरेज फर्म नोमुराने ओएनजीसी स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, ओएनजीसी स्टॉक पुढील काही दिवसांत 290 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. आज गुरूवार दिनांक 23 मे 2024 रोजी ओएनजीसी स्टॉक 0.90 टक्के वाढीसह 280.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ( ओएनजीसी कंपनी अंश )

ब्रोकरेज फर्मचा अंदाज आहे की, ओएनजीसी कंपनीला उपकर आणि रॉयल्टी संरचना तसेच विंडफॉल टॅक्समधून सवलत मिळाल्याने मजबूत फायदा होऊ शकतो. याशिवाय, KG 98/2 व्हॉल्यूमसह गॅस व्हॉल्यूम वाढण्याचा फायदा ओएनजीसी कंपनीला होणार आहे. आर्थिक वर्ष 2024-2025 मध्ये ओएनजीसी कंपनीचा EBITDA 5 टक्के वाढण्याची अपेक्षा आहे. तर आर्थिक वर्ष 2025-2026 मध्ये कंपनीचा EBITDA 14 टक्के वाढू शकतो.

ब्रोकरेज फर्म जेफरीजने ओएनजीसी स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक 390 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. तज्ञांच्या मते, ओएनजीसी कंपनीचा स्टँडअलोन EBITDA अंदाजानुसार आला आहे. कमी खर्चामुळे कंपनीचा नफा देखील अपेक्षेपेक्षा 14 टक्के अधिक नोंदवला गेला आहे. ब्रोकरेज फर्म CLSA ने देखील ओएनजीसी स्टॉकवर बाय रेटिंग देऊन 330 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. ब्रोकरेज फर्मच्या मते, आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये ओएनजीसी कंपनीचा EPS 2 टक्के आणि आर्थिक वर्ष 2025-2026 मध्ये 7 टक्के वाढू शकतो.

मार्च 2024 तिमाहीत ओएनजीसी कंपनीचे उत्पन्न तिमाही-दर-तिमाही आधारावर 11 टक्के वाढून 38,367 कोटी रुपये नोंदवले गेले आहे. डिसेंबर 2023 तिमाहीत ओएनजीसी कंपनीचे उत्पन्न 34,788 कोटी रुपये नोंदवले गेले आहे. कंपनीचा EBITDA तिमाही-दर-तिमाही आधारावर 17,626 कोटी रुपयेवरून 2.2 टक्के कमी होऊन 17,230 कोटी रुपये नोंदवला गेला आहे.

ओएनजीसी स्टॉकचा मागोवा घेणाऱ्या 30 तज्ञापैकी 19 जणांनी ओएनजीसी स्टॉकवर बाय रेटिंग जाहीर केली आहे. 5 जणांनी स्टॉक होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे. तर 6 जणांनी स्टॉक तत्काळ विक्री करण्याचा सल्ला दिला आहे. 2024 या वर्षात ओएनजीसी स्टॉक आतापर्यंत 40 टक्के वाढला आहे. मात्र मागील एका महिनाभरापासून हा स्टॉक सपाट राहिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | ONGC Share Price NSE Live 23 May 2024.

हॅशटॅग्स

#ONGC Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x