
Vodafone Idea Share Price | जागतिक ब्रोकरेज फर्म UBS ने भारतीय दूरसंचार क्षेत्रातील 3 कंपनीच्या शेअर्सबाबत आपले अभिप्राय व्यक्त केले आहे. तज्ज्ञांनी व्होडाफोन आयडिया स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 38 टक्के वाढू शकतो. यासह तज्ञांनी भारतीने एअरटेल स्टॉकबाबत 10 टक्के वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे. आणि इंडस टॉवर स्टॉकसाठी तज्ञांनी 62 टक्के वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे.
व्होडाफोन आयडिया :
मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 15.10 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील एका आठवड्यात या कंपनीचे शेअर्स 14 टक्क्यांनी वाढले होते. तज्ञांच्या मते, जर सरकारने या कंपनीला सवलत दिली तर शेअर्सची किंमत 70-80 टक्के वाढू शकते. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील 12-14 महिन्यांत 38 टक्के वाढू शकतो. आज सोमवार दिनांक 27 मे 2024 रोजी व्होडाफोन आयडिया स्टॉक 15.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. नुकताच Vodafone Idea कंपनीने 18000 कोटी रुपये मूल्याचा FPO लाँच केला होता. पुढील काही महिन्यांत ही कंपनी कर्जाच्या माध्यमातून 25,000 कोटी रुपये भांडवल उभारणी करणार आहे. या निधीचा वापर कंपनी 5G सेवा सुरू करण्यासाठी करणार आहे.
इंडस टॉवर :
UBS फर्मने Indus Tower स्टॉकवर न्युट्रल रेटिंग जाहीर केली आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक 355 रुपये किमतीवर जाऊ शकतो. हा स्टॉक सध्याच्या किमतीच्या तुलनेत 62 टक्के वाढू शकतो. मागील तीन महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 43 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज सोमवार दिनांक 27 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.92 टक्के घसरणीसह 343.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
एअरटेल :
UBS फर्मने Bharti Airtel स्टॉकवर न्यूट्रल रेटिंग देऊन 1310-1430 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. मागील आठवड्यात हा शेअर साडेतीन टक्क्यांच्या वाढीसह 1388 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. मागील तीन महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 23 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज सोमवार दिनांक 27 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.67 टक्के वाढीसह 1,397.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.