 
						Vodafone Idea Share Price | मागील काही दिवस शेअर बाजारात जबरदस्त तेजी पाहायला (SGX Nifty) मिळाली होती. त्यामुळे शेअर बाजारात गुंतवणूकदारांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. दुसरीकडे, शुक्रवारी RBI ने जाहीर केलेल्या सीआरआर कपातीचा देखील स्टॉक मार्केटच्या तेजीला फायदा (Gift Nifty Live) होणार आहे. विशेष म्हणजे येत्या काही दिवसांत स्टॉक मार्केट निफ्टी २५००० चा टप्पा पार करू शकतो, असे संकेत तज्ज्ञांनी दिले आहेत. (व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी अंश)
गेल्या 6 महिन्यांत व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी शेअर 48 टक्क्यांहून अधिक घसरला आहे. गेल्या ५ दिवसांत हा शेअर 2.05 टक्क्यांनी घसरली आहे. मागील एका वर्षात व्होडाफोन आयडिया शेअर 37.05 टक्क्यांनी घसरला आहे. मात्र मागील ५ वर्षांत शेअरने १७.६८ टक्के परतावा दिला आहे. व्होडाफोन आयडिया कंपनीचे एकूण मार्केट कॅप 56,596 कोटी रुपये आहे. मात्र आता शेअर्समध्ये तेजी येण्याचे संकेत तज्ज्ञांनी दिले आहेत.
कंपनी संचालक मंडळाची बैठक – महत्वाचा निर्णय
9 डिसेंबर 2024 रोजी व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत कंपनी संचालक मंडळाकडून 2000 कोटी रुपयांचा निधी उभारण्यावर विचार केला जाईल. व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी सोमवार, 9 डिसेंबर 2024 प्रेफरेंशियल इक्विटी इश्यूद्वारे 2000 कोटी रुपये उभारण्याच्या प्रस्तावावर विचार करेल, अशी माहिती व्होडाफोन आयडिया कंपनीने स्टॉक मार्केटला दिली आहे.
व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीने या वर्षाच्या सुरुवातीलाच फॉलोऑन पब्लिक ऑफरच्या (एफपीओ) माध्यमातून 18,000 कोटी रुपये उभे केले होते. दरम्यान, नोव्हेंबर हा सलग तिसरा महिना होता, जेव्हा जुलैमध्ये दरवाढीनंतर लगेचच व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीच्या ग्राहकांसह इतर खासगी टेलिकॉम कंपन्यांच्या ग्राहकांमध्येही मोठी घट झाली आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		