5 May 2024 12:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, गुंतवणुकीची संधी सोडू नका PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

VST Tillers Tractors Share Price | शेअर बाजार कमजोर असताना हा स्टॉक तेजीत धावतोय, नेमकं कारण काय?

VST Tillers Tractors Share Price

VST Tillers Tractors Share Price | मागील दोन दिवसांपासून शेअर बाजारात किंचित रिकव्हरी पाहायला मिळत होती, मात्र आज पुन्हा शेअर बाजारात विक्रीचा दबाव वाढला आहे. शेअर जबरदस्त कमजोरी असतानाही ‘व्हीएसटी टिलर्स’ कंपनीचे शेअर्स हिरव्या निशाणीवर ट्रेड करत आहे. गुरूवार दिनाक 23 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.81 टक्के वाढीसह 2,353.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘व्हीएसटी टिलर्स’ कंपनीचे शेअर्स 18 टक्क्यांच्या वाढीसह 2572 रुपयांवर ट्रेड करत होते. दिवसा अखेर हा स्टॉक 7.57 टक्के वाढीसह 2335 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. ‘व्हीएसटी टिलर्स’ कंपनीचे बाजार भांडवल 2,017.33 कोटी रुपये आहे. (VST Tillers Tractors Limited)

शेअर वाढीचे कारण :
‘व्हीएसटी टिलर्स’ कंपनीच्या मते कंपनीने बेंगळुरू येथील उत्पादन प्रकल्पात 5,00,000 पॉवर टिलर्सचे उत्पादन लक्ष साध्य केले आहे. सध्या भारतात एकूण पॉवर टिलर उद्योगचे 60,000 युनिट्स असून 2025 पर्यंत ते 1,00,000 युनिट्सपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. ‘व्हीएसटी टिलर्स’ कंपनी या विभागातील एक आघाडीची कंपनी मानली जाते. कंपनीने या उद्योगाशी संबंधित 65 टक्क्यांहून अधिक बाजारपेठ काबीज केली आहे. व्हीएसटी कंपनी लहान शेती यांत्रिकीकरणावर लक्ष केंद्रित करत असून लहान आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी स्मार्ट फार्म मशीनची निर्मिती करत आहे. ‘व्हीएसटी टिलर्स’ कंपनीने 16 HP आणि 9 HP रेंजमध्ये इलेक्ट्रिक स्टार्ट पॉवर टिलर लाँच केले आहे. व्हीएसटी स्मार्ट फार्म मशीन्स शेतीच्या सर्व टप्प्यांसाठी उपयोगी आहेत.

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत ‘व्हीएसटी टिलर्स’ कंपनीचा व्यापार 7.6 टक्क्यांच्या वाढीसह 635.80 कोटी रुपयेवरून वाढून 683.82 कोटी रुपयेवर पोहचला आहे. त्याच वेळी कंपनीचा निव्वळ नफा 28 टक्क्यांनी घसरला असून 55.22 कोटी रुपयेवर आला आहे. कच्च्या मालाची महागाई आणि इतर ऑपरेटिंग खर्चात वाढ झाल्यामुळे कंपनीच्या EBITDA मार्जिनमध्ये कमालीची घट पाहायला मिळत आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| VST Tillers Tractors Share Price BSE 531266 NSE VSTTILLERS on 23 March 2023.

हॅशटॅग्स

VST Tillers Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x