30 May 2023 1:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | पाच स्वस्त पेनी शेअर्स! एका महिन्यात पैसा गुणाकारात वाढतोय, स्टॉक लिस्ट पहा Redmi Note 12T Pro | 64 MP कॅमेरा आणि 144Hz डिस्प्ले, Xiaomi चा नवा 5G स्मार्टफोन लाँच, किंमत आणि फीचर्स पहा Symphony Share Price | कुलर बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरने 3,00,000 टक्के परतावा दिला, 1 लाखाच्या गुंतवणुकीचे झाले 30 कोटी, स्टॉक डिटेल्स Money Saving Tips | पैसे हाताशी थांबत नाहीत का? फॉलो करा या 8 टिप्स आणि आयुष्यातील आर्थिक बदल पहा शिंदे गट धोक्यात! आज निवडणूक झाल्यास शिंदे यांच्या शिवसेना गटाला केवळ 5.5% मते मिळतील, मनसे सर्वेतही शिक्कल नाही - सर्वेक्षण रिपोर्ट Adani Enterprises Share Price | 1 महिन्यात अदानी एंटरप्रायझेस शेअरने 32% परतावा दिला, अदानी स्टॉक तेजीत, ब्लॉकडीलची जादू काय आहे? Axita Cotton Share Price | सुवर्ण संधी! एक्झीटा कॉटन कंपनी 28 रुपयाचा शेअर 56 रुपयांना बायबॅक करणार, रेकॉर्ड डेटच्या आधी फायदा घ्या
x

Zomato Share Price | 65 टक्क्याने स्वस्त झालेला झोमॅटो शेअर पुन्हा 65 टक्के परतावा देणार? स्टॉक वाढीबद्दल नेमका रिपोर्ट काय?

Zomato Share Price

Zomato Share Price | ‘झोमॅटो’ या ऑनलाईन फूड डिलिव्हरी कंपनी शेअर्समध्ये कमालीची उलाढाल पाहायला मिळत आहे. 2021 मध्ये जेव्हा या कंपनीचा IPO आला होता, तेव्हा त्याने आपल्या गुंतवणूकदारांना अल्पावधीत मजबूत परतावा कमावून दिला होता. परंतु त्यानंतर शेअरमध्ये विक्रीचा दबाव वाढला आणि आतापर्यंत हा स्टॉक 65 टक्के कमजोर झाला आहे. नोव्हेंबर 2021 मध्ये या कंपनीचे शेअर्स 154 रुपयेवर पोहचले होते. तथापि ब्रोकरेज फर्मने अजूनही या स्टॉकवर खरेदीचे रेटिंग कायम ठेवले आहे. एचएसबीसी ग्लोबल रिसर्च फर्मनुसार झोमॅटो कंपनीचा स्टॉक पुढील काळात 64.15 टक्के पर्यंत वाढू शकतो. (Zomato Limited)

शेअरची लक्ष्य किंमत :
एचएसबीसी ग्लोबल रिसर्च फर्मच्या तज्यनी आपल्या अहवालात म्हंटले आहे की, झोमॅटो कंपनीचा स्टॉक पुढील काळात 87 रुपयांपर्यंत वाढू शकतो. सध्याच्या किमतीच्या तुलनेत या स्टॉकमध्ये 64 टक्के वाढ अपेक्षित आहे. गुरूवार दिनांक 23 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.56 टक्के घसरणीसह 52.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. YTD आधारे या कंपनीचे शेअर्स 12.44 टक्के कमजोर झाले आहेत. या खराब कामगिरीनंतरही एचएसबीसी फर्मने स्टॉकवर ‘बाय’ रेटिंग कायम ठेवत स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

मागील काही महिन्यांपासून ऑनलाईन अन्न वितरण व्यवसाय झपाट्याने मंदावला असून चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत आणखी कमी होण्याची शक्यता आहे. पण ब्रोकरेजला झोमॅटो कंपनीचे शेअर्स तेजीत वाढू शकतात अशी अपेक्षा आहे. ब्रोकरेज फर्मने सांगितले आहे की, झोमॅटो कंपनी आपला गमावलेला बाजार हिस्सा परत मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. कंपनीच्या ‘झोमॅटो गोल्ड’ सेवेला देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे पुढील काळात या कंपनीचे शेअर्स वाढतील यात शंका नाही. ब्रोकरेज फर्मने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, झोमॅटो कंपनीचे शेअर्स FY2024 मध्ये 57 टक्के वाढू शकतात.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Zomato Share Price BSE 543320 on 23 March 2023.

हॅशटॅग्स

#Zomato Share Price(48)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x