
What Is Multibagger Stocks | मल्टीबॅगर स्टॉक ओळखण्यासाठी, तुम्हाला कंपनीच्या काही मूलभूत तत्वांचे निरीक्षण करावे लागेल. एशियन पेंट्स, पीसी ज्वेलर्स, MRF, दीपक नायट्रेट हे स्टॉक मल्टीबॅगर स्टॉकची म्हणून ओळखले जातात. शेअर बाजारात पैसे गुंतवणाऱ्या सर्व लोकांना गुंतवणुकीतून भरघोस परतावा कमवायचा असतो.
मल्टीबॅगर स्टॉक्स म्हणजे काय?
चला जाणून घेऊ. मल्टीबॅगर स्टॉक्स हे असे शेअर्स असतात जे आपल्या गुंतवणूकदारांना त्यांच्या मूळ गुंतवणूक मूल्यापेक्षा अनेक पट जास्त परतावा कमावून देतात. उदाहरणार्थ, दीपक नायट्रेट आणि पीसी ज्वेलर्स यासारखे शेअर्स मल्टीबॅगर स्टॉक्स म्हणून ओळखले जातात. एखादा स्टॉकची किंमत दुप्पट वाढली तर त्याला टू-बॅगर स्टॉक असे म्हणतात. त्याचप्रमाणे 10 पट अधिक परतावा कमावून देणाऱ्या स्टॉकला टेन-बॅगर स्टॉक असे म्हणतात.
अनेकदा लोकांना मल्टी बॅगर स्टॉकबद्दल जेव्हा माहित पडते, तेव्हा त्याची किंमत खूप वाढलेली असते. इतक्या वाढत्या किमतीवर हे शेअर्स खरेदी करणे अतिशय धोक्याचे असते. प्रत्येक स्टॉक कायम वाढतच राहतो असे नसते. त्याचवेळी तुम्ही उच्चांक पातळी किमतीवर भरघोस परतावा देणारे स्टॉक खरेदी करणे टाळावे. आता प्रश्न असा पडतो की हे मल्टीबॅगर ओळखायचे कसे? आज या लेखात, आम्ही तुम्हाला मल्टीबॅगर स्टॉक ओळखून कमाई कशी करायची हे सांगणार आहोत.
कंपनीच्या मूलभूत गोष्टींवर लक्ष ठेवा :
मल्टीबॅगर परतावा देणाऱ्या कंपन्यांचे कॉर्पोरेट गव्हर्नन्स आणि व्यवस्थापन अतिशय शक्तिशाली असते. तसेच, त्यांचा व्यवसाय इतका शानदार असतो की त्यात खूप काळात तुम्हाला वेगवान वाढ होताना दिसून येईल. असे भरघोस परतावा देणारे स्टॉक ओळखण्याचे अनेक मार्ग असतात. मल्टीबॅगर स्टॉक कंपनीचे कर्ज तिच्या इक्विटी मूल्याच्या 30 टक्क्यांपेक्षा जास्त नसावे. त्यांच्या महसुलात वाढ होण्याची क्षमता अधिक असावी, आणि PE मध्ये होणारी वाढ स्टॉकच्या किमतीच्या वाढीपेक्षा जास्त असावी. ज्या स्टॉक मध्ये हे गुणधर्म असतात, त्या स्टॉकमध्ये मल्टीबॅगर परतावा देण्याची भरपूर क्षमता असते. याशिवाय, कंपनीच्या भांडवली खर्चाच्या मॉडेलवरही लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
इक्विटी व्हॅल्यू आणि PE ग्रोथ म्हणजे काय?
इक्विटी मूल्य म्हणजेच सामान्य शब्दात त्याला कंपनीचे मार्केट कॅप/बाजार भांडवल असे म्हणतात. कंपनीच्या बाजार भांडवलची गणना करण्याचा अतिशय सोपा मार्ग म्हणजे बाजारात ट्रेड करणाऱ्या कंपनीच्या शेअर्सची संख्या एका शेअरच्या मूल्यावर गुणाकार केल्यास तुम्हाला कंपनीचे बाजार भांडवल मिळते. PE म्हणजे शेअरच्या किंमतीच्या तुलनेत कमाईचे एकूण प्रमाण. यावरून कंपनीच्या एका शेअरची किंमत त्या शेअरवरील कमाईच्या तुलनेत किती असेल याचे मूल्य मिळते. हे PE गुणोत्तर कंपनीच्या मूल्यांकनाची गणना करण्यासाठी वापरले जातात. उच्च PE चा अर्थ म्हणजे स्टॉक ओव्हरव्हॅल्यू झाला आहे, किंवा गुंतवणूकदारांना असा अंदाज आहे की स्टॉकमध्ये झपाट्याने वाढ होणे अपेक्षित आहे. अशा कंपन्या ज्यांचे कोणतेही उत्पन्न नाही किंवा सतत तोटा होत आहे, त्यांचे PE गुणोत्तर नकारात्मक असते, किंवा त्यांना कोणतेही PE गुणोत्तर नसते. PE गुणोत्तरची गणना करण्याचा योग्य मार्ग म्हणजे ठराविक कालावधीत स्टॉकच्या कमाईतील वाढीनुसार PE गुणोत्तर विभाजित करणे.
मल्टीबॅगर स्टॉक्सची काही उदाहरणे :
आयशर मोटर्स, एमआरएफ लिमिटेड, एशियन पेंट्स, पिडीलाइट इंडस्ट्रीज आणि बजाज फायनान्स ही टॉप मल्टीबॅगर स्टॉक उदाहरणे आहेत. या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना बंपर परतावा कमावून दिला आहे. तुम्हीही वर नमूद केलेल्या मूलभूत गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुम्ही असे मल्टीबॅगर स्टॉक शोधून जबरदस्त परतावा कमवू शकता.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.