
Yasho Industries Share Price | यशो इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीने मागील 3 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस कमाई करून दिली आहे. मागील 3 वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत तब्बल 1300 टक्के मजबूत झाली आहे. आता कंपनीबाबत एक मोठी अपडेट आली आहे. बीएसईच्या अधिकृत वेबसाइट जाहीर केलेल्या माहितीनुसार यशो इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स आता एनएसई इंडेक्सवर देखील सूचीबद्ध होणार आहे.
यशो इंडस्ट्रीज या कंपनीचे शेअर्स पूर्वी फक्त BSE इंडेक्सवर लिस्टेड करण्यात आले होते. आज सोमवार दिनांक 21 ऑगस्ट 2023 रोजी यशो इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.75 टक्के घसरणीसह 1,789.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
लेटेस्ट अपडेट :
मागील आठवड्यात शुक्रवारी यशो इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स 4 टक्के वाढीसह 1803.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. यशो इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीने सेबीला दिलेल्या माहिती म्हंटले होते, की त्यांची कंपनीचे शेअर्स NSE इंडेक्सवर करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार आज सोमवार दिनांक 21 ऑगस्ट 2023 रोजी पासून या कंपनीचे शेअर्स NSE इंडेक्सवर सूचीबद्ध केले जाणार आहे.
शेअरची कामगिरी :
19 ऑगस्ट 2020 रोजी यशो इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 130 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज 21 ऑगस्ट 2023 रोजी हा स्टॉक 1700 रुपयेपेक्षा जास्त किमतीवर ट्रेड करत आहे. 2020 नंतर यशो इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या शेअरची किंमत 1250 टक्क्यांनी मजबूत झाली आहे.
मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 35 टक्के नफा कमावून दिला आहे. तर मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 23.41 टक्के वाढली आहे. मागील पाच वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 1,555.69 टक्के नफा कमावून दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.