
Yes Bank Share Price | मागील काही महिन्यांपासून येस बँक शेअर बाजारातील सर्वात आवडत्या कंपन्यांपैकी एक होता. येस बँक शेअर सर्वाधिक शेअरहोल्डर्स असलेल्या शेअर्सपैकी (NSE: YESBANK) एक होता. मात्र, सप्टेंबर तिमाहीत येस बँक शेअरहोल्डर्सच्या संख्येत मोठी घसरण झाल्याचं आकडेवारी सांगते. येस बँकेच्या शेअरहोल्डर्सची संख्या जवळपास ५४ हजारांनी घटली आहे. (येस बँक अंश)
सर्वात जास्त शेअरहोल्डर्स असलेली बँक
दुसऱ्या तिमाहीत येस बँकेच्या शेअरहोल्डर्सची संख्या घटली असली तरी सुमारे ६.१ कोटी गुंतवणूकदारांसह ही देशातील सर्वात जास्त शेअरहोल्डर्स असलेली बँक आहे. शुक्रवार 25 ऑक्टोबर रोजी हा शेअर 2.60 टक्के घसरून 19.50 रुपयांवर पोहोचला होता. सध्या या बँकेचे एकूण मार्केट कॅप 60,781 कोटी रुपये आहे.
तज्ज्ञ काय म्हणाले?
स्टॉक मार्केट तज्ज्ञांचे याबाबत मत आहे की, ‘बहुतेक रिटेल गुंतवणूकदार शॉर्ट टर्म मध्ये मोठा नफा मिळण्याच्या आमिषाने अंडरपरफॉर्मिंग शेअर्समध्ये गुंतवणूक करतात. मात्र, असे शेअर्स अधिक काळ टिकत नाहीत आणि गुंतवणूकदारांची निराशा होते. नंतर हेच गुंतवणूकदार अधिक नुकसान टाळण्यासाठी शेअर्स विकून बाहेर पडतात. त्यानंतर अनेक गुंतवणूकदार हे शेअर्स स्वस्तात मिळत असल्याने पुन्हा खरेदी करून अधिक नफ्याची अपेक्षा करतात.
सॅमको सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्म
सॅमको सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मचे तज्ज्ञ अपूर्व सेठ म्हणाले की, स्टोक मार्केट गुंतवणूकदार येस बँक, व्होडाफोन आयडिया, रिलायन्स पॉवर आणि सुझलॉन सारख्या कमी किमतीच्या शेअर्सना प्राधान्य देतात. कारण त्यांना वाटते की हे शेअर्स झटपट दुप्पट परतावा देऊ शकतात. पण अशी गुंतवणूक अनेकदा धोक्याची ठरते.
शेअरने किती परतावा दिला
मागील ६ महिन्यात येस बँक शेअर 24.86% घसरला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 21.88% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात हा शेअर 62.61% घसरला आहे. YTD आधारावर हा शेअर 13.91% घसरला आहे. तर लॉन्ग टर्म गुंतवणूकदारांना या शेअरने 57.64% परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.