
HDFC Mutual Fund | सध्या जर तुम्ही तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी आर्थिक नियोजन करू इच्छित असाल तर तुम्ही चाइल्ड म्युच्युअल फंड योजनेत गुंतवणुक करू शकता. चाइल्ड फंड देखील सामान्य म्युच्युअल फंडांसारखेच असतात, परंतु त्यांचा परतावा देण्याचा ट्रॅक रेकॉर्ड अधिक चांगला असतो. असे अनेक चाइल्ड म्युचुअल फंड आहेत जे दीर्घ मुदतीत उच्च परतावा कमावून देतात. तुम्ही एसआयपीच्या माध्यमातून अशा फंडांमध्ये काही रक्कम गुंतवून तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी मोठा निधी तयार करू शकता.
एचडीएफसी चिल्ड्रन्स गिफ्ट फंड :
या योजनेने आपल्या गुंतवणुकदारांना सर्वाधिक दीर्घकालीन SIP परतावा दिला आहे. या फंडाचा 23 वर्षांचा एसआयपी रिटर्न डेटा उपलब्ध असून या काळात फंडाचा वार्षिक परतावा 16.51 टक्के नोंदवला गेला आहे. जर तुम्ही केवळ 25000 रुपये आगाऊ गुंतवणूकीसह 5000 रुपये मासिक एसआयपी गुंतवणूक केली असती तर आता तुम्हाला 1.37 कोटी रुपये परतावा मिळाला असता.
* मासिक SIP : 5000 रुपये
* अपफ्रंट गुंतवणूक : 25000 रुपये
* कालावधी : 23 वर्षे
* वार्षिक परतावा : 23 वर्षांमध्ये 16.51 टक्के
* एकूण गुंतवणूक : 14,05,000 रुपये
* SIP चे एकूण मूल्य 23 वर्षांमध्ये : 1,37,23,533 रुपये
ही म्युचुअल फंड योजना 2 मार्च 2001 रोजी सुरू करण्यात आली होती. लाँच झाल्यापासून या योजनेने गुंतवणुकदारांना 16.74 टक्के परतावा दिला आहे. तुम्ही या योजनेत एकरकमी 100 रुपये आणि SIP द्वारे 100 रुपये जमा करून गुंतवणूक करू शकता. 31 जुलै 2024 पर्यंत या म्युचुअल फंडाची एकूण मालमत्ता 9780 कोटी रुपये नोंदवली गेली होती, तर त्यांचे खर्चाचे प्रमाण 1.74 टक्के नोंदवले गेले होते.
ICICI प्रुडेन्शियल चाइल्ड केअर फंड :
या म्युचुअल फंडाचा वार्षिक परतावा 15.21 टक्के आहे. यामध्ये, जर एखाद्याने केवळ 25000 रुपयांच्या आगाऊ गुंतवणूकीसह 5000 रुपयांची मासिक एसआयपी केली असेल, तर आता त्याच्याकडे सुमारे 1.13 कोटी रुपये असतील.
* मासिक SIP : 5000 रुपये
* अपफ्रंट गुंतवणूक : 25000 रुपये
* कालावधी : 23 वर्षांचा
* वार्षिक परतावा : 23 वर्षांमध्ये 15.21 टक्के
* एकूण गुंतवणूक : 14,05,000 रुपये
* SIP चे एकूण मूल्य 23 वर्षांमध्ये : 1,12,80,455 रुपये
ही म्युचुअल फंड योजना 31 ऑगस्ट 2001 रोजी लाँच करण्यात आली होती. लाँच झाल्यापासून या योजनेने गुंतवणुकदारांना 16.24 टक्के वार्षिक परतावा दिला आहे. तुम्ही या योजनेत एकरकमी 5000 रुपये आणि SIP द्वारे 100 रुपये जमा करून गुंतवणूक सुरू करू शकता. 31 जुलै 2024 पर्यंत या म्युचुअल फंड योजनेची एकूण मालमत्ता 1364 कोटी रुपये होती, तर खर्चाचे प्रमाण 2.19 टक्के होते.
टाटा यंग सिटिझन्स फंड :
मागील 29 वर्षात या म्युचुअल फंडाने 13.51 टक्के वार्षिक परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही या योजनेत 25000 रुपये आगाऊ गुंतवणूकीसह 5000 रुपये मासिक SIP केली असती, तर आता तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 1.93 कोटी रुपये झाले असते. 23 वर्षांत तुम्हाला 1 कोटी रुपये परतावा मिळाला असता.
* मासिक SIP : 5000 रुपये
* अपफ्रंट गुंतवणूक : 25000 रुपये
* कालावधी : 29 वर्षे
* वार्षिक परतावा : 13.51 टक्के
* एकूण गुंतवणूक 29 वर्षांमध्ये : 17,65,000 रुपये
* SIP चे एकूण मूल्य 29 वर्षांमध्ये : 1,92,70,129 रुपये
ही म्युचुअल फंड योजना 14 ऑक्टोबर 1995 रोजी लाँच करण्यात आली होती. लाँच झाल्यापासून या योजनेने गुंतवणुकदारांना 13.50 टक्के परतावा कमावून दिला आहे. तुम्ही या योजनेत किमान 500 रुपये एकरकमी आणि 500 रुपये SIP द्वारे जमा करून गुंतवणूक सुरू करू शकता. 31 जुलै 2024 पर्यंत या म्युचुअल फंडाची एकूण मालमत्ता 383 कोटी रुपये होती, तर खर्चाचे प्रमाण 2.60 टक्के होते.