9 October 2024 3:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअर आला फोकसमध्ये, 343% परतावा देणारा स्टॉक BUY करावा की Sell - Marathi News IRFC Vs BEL Share Price | हे PSU शेअर्स करणार मालामाल, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - Marathi News IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक खरेदीला गर्दी - Marathi News Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, मालामाल करणार हा स्टॉक - Marathi News Gold Rate Today | खुशखबर! सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Marathi News Pension Life Certificate | डोअरस्टेप बँकिंग सर्विसच्या माध्यमातून जमा करा 'लाईफ सर्टिफिकेट', घरबसल्या होईल काम IPO GMP | पैसे तयार ठेवा, सर्वात मोठा IPO लाँच होतोय, ₹13720 मध्ये मिळेल 1 लॉट, संधी सोडू नका - Marathi News
x

Business Idea | बेकरी व्यवसाय करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी! या तरुणीने उभारला मोठ्या उद्योग, तुमची सुद्धा सुरु करा

Business Idea

Business Idea | उच्च पदवी घेतल्यानंतर मोठ्या आणि बहुचर्चित कंपनीमध्ये आपल्याला नोकरी करता यावी आपलं नाव गगनाला भिडावं अशी इच्छा प्रत्येक तरुण-तरुणीची असते. अनेक तरुण-तरुणी गुगलसारख्या मोठमोठ्या कंपनीमध्ये काम करण्यासाठी दिवस-रात्र एक करून मेहनत घेतात आणि यशाचं शिखर गाठतात.

स्वतःच्या बेकरीचं स्वप्न साकारलं
परंतु एका तरुणीने एममटेक आणि बीटेकसारख्या उच्च पदव्या घेऊन सुद्धा लाखोंच्या पगारावर पाणी सोडलं आहे. व्यवसाय करण्याचा ध्यास मनामध्ये घेऊन तिने स्वतःच्या बेकरीचं स्वप्न साकारलं आहे. ही तरुणी नेमकी कोण आहे? सोबतच तिने एवढ्या कमी कालावधीत यशाचा शिखर कसं गाठलं? याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.

या तरुणीचं नाव राशी असं असून तिने एका वृत्तवाहिनीशी बोलताना स्वतःच्या यशोगाथाबद्दल सांगितलं आहे. स्वतःचा प्रवास सांगताना राशी म्हणली की,”मी मुळची शिव रामनगर नैनिताल येथे राहणारी रहिवाशी आहे. मी बीटेक आणि एमटेकच शिक्षण नोएडा इथून पूर्ण केले आहे. कुटुंबीयांमुळे मला इंजीनियरिंग क्षेत्रात जावं लागलं पण मला अगदी लहानपणापासूनच खाण्याची आणि स्वयंपाकाची आवड होती”.

बेकरीचं नाव ‘ला बेक आमोरे’ असं
राशीच्या बेकरीचं नाव ‘ला बेक आमोरे’ असं असून तिचा हा व्यवसाय लॉकडाऊन नंतर तुफान चालू लागला. या आधी तिने नोएडा येथे एका छोट्याशा फ्लॅटमध्ये बेकरी क्लासेस चालू केले. परंतु कोरोना काळात हा फ्लाईटमधील बिजनेस बंद करावा लागला. परंतु राशी मागे हटली नाही. तिने कोरोना काळात देखील ऑनलाइन बेकरी क्लासेस सुरू ठेवले. यामध्ये तिला चांगला प्रतिसाद देखील मिळाला. त्याचबरोबर तिच्या या उद्योगामुळे अनेकांना रोजगार संधी उपलब्ध होत होत्या. सध्या ती स्किल डेव्हलपमेंटचं काम देखील सांभाळते.

सध्या कोट्यावधींची मालकीण
राशीला बेकरी व्यवसायामध्येच आपलं करियर घडवायचं होतं म्हणून तिने कॉलेजमध्ये असल्यापासूनच बेकरीचे वर्कशॉप घेणं सुरू केलं होतं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर राशीला प्लेसमेंटमधून 50 लाख रुपयांची ऑफर आली होती परंतु गुगल आणि बायजूससारख्या कंपन्यांची ऑफर नाकारून तिने आपलं बेकरीचा स्वप्न पूर्ण केलं. सध्याच्या घडीला राशी कोट्यावधींची मालकीण आहे. तिच्या या जिद्दीचा आणि धडाडीचं कौतुक करावं तेवढं कमी आहे.

Latest Marathi News | Business Idea of Bakery 08 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Business Idea(69)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x