13 December 2024 9:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

Penny Stock | बँक FD 1 लाखावर किती व्याज परतावा देईल? या 3 रुपयाच्या शेअरने 1.18 कोटी परतावा दिला, खरेदी करणार?

Penny Stock

Multibagger Stock | ग्रॅन्युल्स इंडिया ही फार्मा क्षेत्रातील एक दिग्गज कंपनी म्हणून ओळखली जाते. मागील काही दिवसांपासून शेअर बाजरी किरकोळ चढउतार पाहायला मिळत आहे. तथापि या कंपनीच्या स्टॉकने दीर्घ मुदतीत आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. ग्रॅन्युल्स इंडिया कंपनीने फक्त 14 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांचे एक लाख रुपये करोडो मध्ये रुपांतरीत केले आहे. हा स्टॉक भविष्यातही तो जबरदस्त तेजीचा कल दर्शवत आहे . देशांतर्गत ब्रोकरेज फर्म जिओजित बीएनपी परिबसच्या या कंपनीचं शेअर्स 408 रुपयाची किंमत पातळी स्पर्श करू शकतात. सध्याच्या किंमतीपेक्षा हा स्टॉक 15 टक्क्यांनी वाढले असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. शुक्रवार दिनांक 25 नोव्हेंबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स NSE निर्देशांकावर 356.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

14 वर्षात लोकांना बनवले करोडपती :
24 ऑक्टोबर 2008 रोजी ग्रॅन्युल्स इंडिया कंपनीचे शेअर्स 3.03 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सध्या हा स्टॉक 118 पट वाढला असून तो 356.25 रुपयांवर ट्रेड करत आहे. ज्या लोकांनी त्यावेळी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून आता 1.18 कोटी रुपये झाले आहे. या कंपनीच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना केवळ दीर्घ मुदतीतच नव्हे तर अल्पावधीतही भरघोस नफा कमावून दिला आहे.

शेअरचा इतिहास :
20 जून 2022 रोजी या फार्मा कंपनीचा स्टॉक 226.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. ही या शेअरची एका वर्षातील विक्रमी नीचांक किंमत पातळी होती. यानंतर, ग्रॅन्युल्स इंडिया कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी आली आणि स्टॉकची खरेदी वाढली. 4 नोव्हेंबर 2022 पर्यंत स्टॉकमध्ये 68 टक्क्यांच्या वाढ झाली होती, आणि स्टॉकची किंमत 381 रुपयांवर गेली होती. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 381 रुपये आहे. सध्या हा स्टॉक आपल्या उच्चांक किंमत पातळीपासून 7 टक्के कमी किमतीवर उपलब्ध झाला आहे.

Granules India कंपनीचे उत्पादन :
ही कंपनी मुख्यतः Active Pharma Ingredients, Pharma Formulation Intermediates आणि Finished Dosages, पॅरासिटामॉलचे उत्पादन करते. कंपनीच्या उत्पादनांची विक्री आणि मार्केट शेअर तसेच नवीन उत्पादनाच्या लॉन्चमध्ये वाढ झाल्यामुळे सप्टेंबर 2022 च्या तिमाहीत कंपनीने 1,150 कोटी रुपये महसूल कमावला होता, जो गेल्या वर्षीच्या तुलनेत 30 टक्क्यांनी वाढला आहे. कंपनीने 145 कोटी रुपये नफा कमावला असून हा गेल्या वर्षीच्या तुलनेत 80 टक्के अधिक आहे.

कंपनीची पुढील वाटचाल पाहता कंपनीला लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीमध्ये आणि वाहतुकीच्या भाड्यामध्ये घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कंपनीच्या व्यवसायाचा विस्तार वेगाने होत आहे. कंपनी लवकरच नवीन प्रोडक्ट्स लॉन्च करण्यावरही काम करत आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन ब्रोकरेज फर्मने या कंपनीच्या शेअरवर बाय रेटिंग देऊन स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी स्टॉकसाठी 408 रुपयांची लक्ष्य किंमत जाहीर केली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Penny Stock of Granules India share price Return on Investment on 28 November 2022.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x