 
						Yes Bank Share Price | येस बँकेचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 7.7 टक्के वाढीसह 21.82 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या बँकेचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी केले जात आहेत. येस बँकेच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, येस बँकेने नुकतीच 4,234 कोटी रुपये मूल्याच्या NPA विकण्याची घोषणा केली आहे.
14 डिसेंबर 2022 रोजी येस बँकेचे शेअर्स 24.75 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर ट्रेड करत आहेत. 23 ऑक्टोबर 2023 रोजी येस बँकेचे शेअर्स 14.10 रुपये हा आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. आज शुक्रवार दिनांक 15 डिसेंबर 2023 रोजी येस बँक स्टॉक 1.17 टक्के वाढीसह 21.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार, येस बँकेने नुकतीच आपले 4,234 कोटी रुपये मूल्याच्या NPA विक्रीसाठी एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट मागवले आहेत. येस बँकेने 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत 3,073,66 कोटी रुपयेची निधी आधारित थकबाकी आणि 17.83 कोटी रुपये मूल्याची नॉन-परफॉर्मिंग मालमत्तांसह 3,092 कोटी मूल्याचे कॉर्पोरेट NPA अवरोधित केले आहेत.
मागील दीड महिन्यात येस बँकेच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 54 टक्के परतावा कमावून दिला आहे. सध्या येस बँक स्टॉक आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीच्या तुलनेत 14 टक्के खाली ट्रेड करत आहेत.
गुंतवणूक सल्लागारांच्या मते, येस बँक स्टॉक सकारात्मक वाढीचे संकेत देत आहेत. येस बँकेच्या शेअरने आपल्या मागील उच्चांक किंमतीला ओलांडून अनेक ब्रेकआऊट दिले आहेत. येस बँक स्टॉक दैनिक DMI आणि रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स काउंटर तेजीचे संकेत देत आहेत. गुंतवणूक सल्लागारांनी येस बँक स्टॉक 26 रुपये टारगेट प्राइससाठी 21-22 रुपये या किमतीच्या दरम्यान खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी गुंतवणूक करताना येस बँक स्टॉकमध्ये 19 रुपये स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		