 
						Yes Bank Share Price | येस बँकेचे शेअर चालू आठवड्याच्या पहिल्या ट्रेडिंग सेशनमध्ये तेजीत वाढत होते. आज मात्र या बँकेचे शेअर्स विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत. शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते नॉन- परफॉर्मिंग अॅसेटबाबत सकारात्मक अपडेट आल्यानंतर येस बँकेच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली होती.
येस बँकेने सेबीला दिलेल्या माहितीनुसार, येस बँकेने JC फ्लॉवर्स ARC ला आपल्या NPA पोर्टफोलिओची विक्री केली आहे. आणि या विक्रीतून येस बँकेला 120 कोटी रुपये मिळाले आहेत. आज गुरूवार दिनांक 16 नोव्हेंबर 2023 रोजी येस बँकेचे शेअर्स 0.98 टक्के वाढीसह 20.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
प्रॉफिटमार्ट सिक्युरिटीज फर्मने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, येस बँकेच्या शेअरमध्ये एनपीए पोर्टफोलिओवर आलेल्या सकारात्मक अपडेटमुळे तेजी पाहायला मिळत आहे. तज्ञांच्या मते येस बँकेचे शेअर्स पुढील काळात आणखी वाढू शकतात. तज्ञांच्या मते, येस बँकेचे शेअर्स दैनिक चार्ट पॅटर्नवर देखील सकारात्मक संकेत देत आहेत.
शेअर बाजारातील तज्ञांनी येस बँकेचे शेअर्स 22 रुपये लक्ष किमतीसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकमध्ये गुंतवणूक करताना 18 रुपये स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते 22 रुपये किंमत पार केल्यावर हा स्टॉक 25 रुपये किंमत स्पर्श करू शकतो.
मागील काही महिन्यात येस बँकेच्या शेअरमध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळाली आहे. मागील पाच ट्रेडिंग सेशनमध्ये येस बँकेचे शेअर्स 11.68 टक्के वाढले आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 20.53 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील सह महिन्यात या कंपनीच्या शेअरची किंमत 29.25 टक्के वाढली आहे. मागील एका वर्षात या बँकेच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 20 टक्के परतावा कमावून दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		