18 May 2024 9:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 18 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Titagarh Rail Systems Share Price | अवघ्या 4 वर्षात दिला 3700% परतावा, तज्ज्ञांकडून शेअरला ओव्हरवेट रेटिंग, फायदा घ्या LIC Share Price | एलआयसीला सर्वात मोठा दिलासा, शेअरमध्ये सुसाट तेजी, स्टॉक प्राईस 1000 रुपयांच्या जवळ NCC Share Price | NCC स्टॉक ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | मालामाल करणार हे टॉप 4 डिफेन्स शेअर्स, अल्पावधीत मिळेल 33 टक्केपर्यंत परतावा RailTel Share Price | या शेअरने 1 वर्षात दिला 235% परतावा, आता पुढील 10 दिवसात मालामाल करणार, खरेदीचा सल्ला Penny Stocks | गुंतवणुकीसाठी टॉप 10 पेनी स्टॉक, रोज अप्पर सर्किट हीट करून पैसे वाढवतील
x

Adani Gas Share Price | अदानी गॅस शेअरने 1 महिन्यात 94 टक्के परतावा कमावून दिला, पण ही तेजी पुढे टिकणार?

Adani Gas Share Price

Adani Gas Share Price | गेल्या काही महिन्यापासून अदानी समूहाचा भाग असलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त खरेदी पाहायला मिळत आहे. लार्ज कॅप सेगमेंटमध्ये अदानी समुहाचे शेअर्स परतावा देण्याच्या बाबतीत अव्वल ठरले आहेत.

हिंडेनबर्गने अदानी समुहाच्या विरोधात नकारात्मक अहवाल प्रकाशित केल्यानंतर अदानी गॅस आणि अदानी ग्रीन एनर्जी या कंपन्याच्या शेअर्सला सर्वाधिक फटका बसला होता. मात्र आता या दोन्ही कंपन्याच्या शेअर्सने आश्चर्यकारक सुधारणा साध्य केली आहे. अवघा एक महिनाभरात या दोन्ही कंपन्यांच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे.

अदानी टोटल गॅस कंपनीच्या शेअर्सने मागील एका महिन्यात आपल्या गुंतवणुकदारांना 94 टक्के परतावा कमावून दिला आहे. अवघ्या एका महिन्यात अदानी टोटल गॅस कंपनीच्या शेअर्सची किंमत 527 रुपये या नीचांक किमतीवरून वाढून 1259.40 रुपये किमतीवर पोहचले होते.

मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी टोटल गॅस कंपनीचे शेअर्स 1046.95 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील एका आठवड्यात अदानी टोटल गॅस कंपनीच्या शेअर्समध्ये 9.50 टक्के घसरण पहायला मिळाली होती. आज मंगळवार दिनांक 19 डिसेंबर 2023 रोजी अदानी टोटल गॅस कंपनीचे शेअर्स 1.32 टक्के घसरणीसह 1,016.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मागील 3 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 65 टक्के परतावा कमावून दिला आहे. ज्या गुंतवणूकदारांनी एक वर्षभरापूर्वी अदानी टोटल गॅस कंपनीचे शेअर्स खरेदी केले होते, ते लोक अजूनही 70 टक्के तोट्यात आहेत. अदानी टोटल गॅस कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 4000 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 522 रुपये होती.

मागील एका महिन्यात उत्तम कामगिरी करणाऱ्यां शेअर्समध्ये अदानी ग्रीन एनर्जी कंपनीचे शेअर्स देखील सामील आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीचे शेअर्स 910 रुपयेवरून वाढून 1700 रुपये किमतीवर पोहचले आहेत. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 1526.65 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

मागील तीन महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 52 टक्के परतावा कमावून दिला आहे. ज्या लोकांनी एक वर्षभरापूर्वी या शेअरमध्ये पैसे लावले होते, ते लोक अजूनही 25 टक्के तोट्यात आहेत. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 2185 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 439.10 रुपये होती. आज मंगळवार दिनांक 19 डिसेंबर 2023 रोजी अदानी ग्रीन कंपनीचे शेअर्स 0.50 टक्के घसरणीसह 1,517.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

याशिवाय अदानी एनर्जी सोल्युशन्स, अदानी पॉवर, अदानी एंटरप्रायझेस आणि अदानी पोर्ट्स या कंपन्याच्या शेअर्सची किंमत देखील 33 ते 39 टक्के वाढली आहे. अंबुजा सिमेंट आणि अदानी विल्मार या कंपनीच्या शेअर्सने देखील गुंतवणूकदारांना 25 टक्के परतावा कमावून दिला आहे.

अदानी समूहाचे शेअर्स वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे, हिंडेनबर्ग अहवालाबाबत सर्वोच्च न्यायालयाने अदानी समुहाला दिलासा दिला आहे. आणि 2024 मध्ये मोदी सरकारच्या पुनरागमनाचे संकेत मिळत असल्याने अदानी समूहाचे शेअर्स तेजीत वाढत आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Adani Gas Share Price NSE 19 December 2023.

हॅशटॅग्स

Adani Gas Share Price(10)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x